Jump to content

तेजस्विता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खगोलशास्त्रामध्ये तेजस्विता (इंग्रजी: Luminosity) म्हणजे एखाद्या तारा, दीर्घिका किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय.[१] SI प्रणालीमध्ये तेजस्विता ज्यूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बऱ्याचदा सूर्याच्या तेजस्वितेच्या पटीत मोजली जाते ज्याची एकूण ऊत्सर्जित ऊर्जा ३.८४६×१०२६ वॅट एवढी आहे.[२] सौर तेजस्वितेचे चिन्ह L हे आहे.

ताऱ्याची तेजस्विता (Brightness) म्हणजे ताऱ्याची दृश्यप्रत[श १]. म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा. सर्वसाधारण दृश्यप्रत १ मानून त्यानुसार इतर ताऱ्यांच्या तेजस्वितेची दृश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या ताऱ्याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या ताऱ्याची ऋण दृश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. +७ व त्यापेक्षा जास्त दृश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

ताऱ्यांची तेजस्विता पुढील दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असते. (१) ताऱ्याचे तापमान आणि (२) ताऱ्याचे आकारमान.

व्याध (इंग्लिश: Sirius, सिरियस) हा रात्रीच्या आकाशातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत उणे १.४६ इतकी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ हॉपकिन्स, जीआन. Glossary of Astronomy and Astrophysics (इंग्रजी भाषेत).
  2. ^ विल्यम्स, डेव्हिड आर. "Sun Fact Sheet — Sun/Earth Comparison" (इंग्रजी भाषेत). १९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. ^ दृश्यप्रत (इंग्लिश: magnitude; मॅग्निट्यूड)