"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५: ओळ २५:
=== हलगीवादन===
=== हलगीवादन===



== सद्यस्थिती ==
== स्थिती ==
मातंग समाजातील बांधव आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग मंडळी आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपले रांगडेपण सिद्ध करतोय. 
मांग समाज बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो. [[महाराष्ट्रातील अनुसूचित जाती]]मध्ये मातंग समाज हा [[महार]]ानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २०,०३,९९६ लोकसंख्या मांगांची होती. मांग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. बहुतांश मातंग समाज हा [[हिंदू]] असून तो [[खंडोबा]]ला कुलदैवत मानतो. तसेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या धर्मांतरानंतर हजारो मांगांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला आहेत.

मातंग आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपली बुद्धीमत्ता सिद्ध करतोय. 


== पोटजाती ==
== पोटजाती ==

००:४३, २७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मांग लोक
वादक मांग (रूसेल १९१६)
एकूण लोकसंख्या

२००१ च्या जनगणनेनुसार
महाराष्ट्र - २०,०३,९९६
गुजरात - २,७६५
दमण आणि दीव - ७०२
राजस्थान - २४१

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : गुजरात  • दमण आणि दीव  • राजस्थान

भाषा
मुख्यः- मराठी, हिंदी
धर्म
हिंदू धर्मबौद्ध धर्म
संबंधित वांशिक लोकसमूह
भारतीय लोक


मांग किंवा मातंग ही महाराष्ट्रातील एक दलित जात व समाज आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती मध्ये मोडले जातात.

इतिहास

भूतकाळातील प्रथा

ग्रहणाच्या वेळी मांग लोक 'दे दान सुटे गिराण' अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. शिवकाळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी 'येल्या मांग' हे आहेत. शिवकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील आद्यगुरू मा. लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण महात्मा फुले, ना दिले. याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

हलगीवादन

स्थिती

मांग समाज बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा महारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २०,०३,९९६ लोकसंख्या मांगांची होती. मांग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. बहुतांश मातंग समाज हा हिंदू असून तो खंडोबाला कुलदैवत मानतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर हजारो मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहेत.

मातंग आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपली बुद्धीमत्ता सिद्ध करतोय. 

पोटजाती

मातंग समाजातील उपजाती/पोटजाती:-

मातंग,मादिंग,दानखनी,मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे,, वगैरे.

उल्लेखनीय व्यक्ती

पुस्तके

  • मांग आणि त्यांचे मागते (डॉ. प्रभाकर मांडे)
  • मांग संस्कृती आणि भाषा (डॉ. मोहन लोंडे)