ग्रहण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेव्हा एखाद्या ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर अथवा इतर खगोलीय वस्तूवर पडते, तेव्हा पहिल्या ग्रहाने दुसऱ्या ग्रहाला ग्रहण लावले असे म्हटले जाते.

सूर्यग्रहण[संपादन]

मुख्य लेख: सूर्यग्रहण
इ.स. १९९९ साली दिसलेले खग्रास सूर्यग्रहण व तेजोवलय

जेव्हा चंद्र, सूर्यपृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येला दिसते.

खग्रास सूर्यग्रहण[संपादन]

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

तेजोवलय (Corona)[संपादन]

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण[संपादन]

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण[संपादन]

या स्थितीत सूर्य पृथ्वीपासून जास्त जवळ असतो व चंद्र जास्त दूर असतो. त्यामुळे चंद्रबिंब सूर्यबिंब पूर्णपणे झाकण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो.

चंद्रग्रहण[संपादन]

मुख्य लेख: चंद्रग्रहण

जेव्हा पृथ्वी, सूर्यचंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण पौर्णिमेलाच दिसते.

अधिक्रमण[संपादन]

जेव्हा एखादा ग्रह, सूर्याच्या अथवा दुसऱ्या एखाद्या ग्रहाच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुधशुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. शुक्राची अधिक्रमणे खूपच दुर्मिळ असतात. इ.स. २००४ साली शुक्राचे अधिक्रमण झाले होते त्यानंतर इ.स. २०१२ मध्ये ५ व ६ जून ला (स्थानाप्रमाणे) हे पहाण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली होती. आता पुढील शुक्राचे अधिक्रमण इ.स. २११२ साली दिसेल.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: