केतू (ज्योतिष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केतू या पानावरून पुनर्निर्देशित)
केतू (ज्योतिष)

केतू
मराठी केतू
निवासस्थान नैऋत्य दिशा
लोक केतुलोक
वाहन गिधाड आणि पारवा,श्येन
शस्त्र भाला
वडील विप्रचित्ति
आई सिंहिका
पत्नी चित्रलेखा
मंत्र ॐ कें केतवे नमः

केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजी: Cauda Draconis, or Dragon's Tail or Catabibazon - ʊ ) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय.

राहु व केतु यांना ज्योतिषशास्त्रात छायाग्रह म्हणतात. हे दोन्ही ग्रह एकाचही राक्षसाच्या शरीरातून जन्मले आहेत, अशी कल्पना आहे. सूर्याने व चंद्राने तक्रार केल्यामुळे भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र फेकून या राक्षसाचे धड व शरीर वेगळे केले. राक्षसाच्या डोक्याकडच्या भागाला राहू म्हणतात, तर धडाच्या भागाला केतू. राहू-केतूंच्या चित्रांत हे स्पष्टपणे कळते. केतूने एका हातात गदा व दुसऱ्या हातात वरमुद्रा धारण केलेली दिसते. गिधाड हे त्याचे वाहन आहे.

राहूप्रमाणेच केतूही सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] (संदर्भाची गरज नाही!!) केतू हा पृथ्वीच्या भ्रमणमार्गावरील एक बिंदू आहे. त्या बिंदूला सूर्यप्रदक्षिणा करण्यास १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो. पृथ्वीला फक्त एक वर्ष. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने केतू जवळजवळ स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी सरकत सरकत केतूजवळ येते तेव्हा पृथ्वीवरून पाहाताना केतू मागेमागे येताना दिसेल. जेव्हा पृथ्वी त्याला ओलांडून पुढे जाईल, तेव्हाही तो मागेमागे पडताना भासेल. म्हणजेच तो सदैव वक्री असेल. साधारण तर्काने हे समजायला हरकत नाही. तेव्हा त्यासाठी संदर्भाची गरज नाही.

जेव्हा केतू (किंवा राहू) बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला राहू/केतूने गिळलेले असते. ग्रहण केव्हा होते हे समजावून सांगण्यासाठी याहून सोपे स्पष्टीकरण असूच शकत नाही.

भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव :-१२,९
  • प्रतिकूल भाव :- ७
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी-धनु, मीन
  • प्रतिकूल राशी :- मिथुन, कन्या
  • मित्र ग्रह :- गुरू
  • सम ग्रह :- गुरू
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण :- धनु
  • स्वराशीचे अंश
  • उंच्च राशी :- धनु
  • नीच राशी :- मिथुन
  • मध्यम गती
  • संख्या:-
  • देवता:- गणपती
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांगर्गत धातू
  • तत्त्व- अग्नि तत्त्व
  • कर्मेंद्रियः‌-
  • ज्ञानेंद्रिय:-
  • त्रिदोषांपैकी दोष:-
  • त्रिगुणापैकी गुण:- तमोगुण[१]
  • लिंग :- स्त्री
  • रंग:- कपोतवर्ण. धूम्र वर्ण[२]
  • द्रव्य
  • निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक. south node of the moon (दक्षिण चंद्र नोड )
  • दिशा: नैर्ऋत्‍य दिशा[१]
  • जाती:-शूद्र[२]
  • रत्न :- लसण्या (Cat's Eye)[१]
  • रस
  • ऋतू:-
  • वय
  • दृष्टी :-७
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष
  • नक्षत्र:- अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र.[१]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ a b c d "Rahu and Ketu in Vedic Astrology, Horoscope, Mythology, Mantras & Remedies". www.astrology-prophets.com. 2020-01-22 रोजी पाहिले.
  2. ^ a b जोशी, अनिरुद्ध. "लाल किताब की नजर से केतु ग्रह | ketu graha in lal kitab". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2020-01-22 रोजी पाहिले.