"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४४: | ओळ ४४: | ||
* नाटक बसते आहे ([[वि. वा. शिरवाडकर]]) |
* नाटक बसते आहे ([[वि. वा. शिरवाडकर]]) |
||
* पाझर (प्रवीण पाटेकर) |
* पाझर (प्रवीण पाटेकर) |
||
* पांढरा बुधवार ([[प्रेमानंद गज्वी]], हे नाटक [[अमरावती][ विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. |
|||
* पाणीपुरी (श्रीपाद देशपांडे) |
* पाणीपुरी (श्रीपाद देशपांडे) |
||
* पिकनिक (संजय जमखंडी) |
* पिकनिक (संजय जमखंडी) |
||
ओळ ५०: | ओळ ५१: | ||
* फिलिप (दर्शन पाटील) |
* फिलिप (दर्शन पाटील) |
||
* बसस्टॉप (सतीश आळेकर) |
* बसस्टॉप (सतीश आळेकर) |
||
* बेरीज-वजाबाकी ([[प्रेमानंद गज्वी]]) |
|||
* भजन ([[सतीश आळेकर]]) |
* भजन ([[सतीश आळेकर]]) |
||
* भिंत ([[सतीश आळेकर]]) |
* भिंत ([[सतीश आळेकर]]) |
१६:०९, २६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानकाची एकता साधणाऱ्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणाऱ्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.
एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजके संवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.
मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकऱ्यांचे 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा.वि. वरेरकर, मो.ग.रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.
इ.स. १९५० मध्ये मुंबईतील भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर होतात.
काही प्रसिद्ध एकांकिका आणि त्यांचे लेखक
अनुवादित :
- अभ्यास (शं.ना. नवरे)
- कदाचित (पु.ल. देशपांडे)
- खुर्च्या (वृंदावन दंडवते)
- जनावर (शं.ना. नवरे), वगैरे.
स्वतंत्र :
- अलगद (हृषीकेश कोळी)
- अल्पविराम (हृषीकेश कोळी)
- ॲश इज बर्निंग (प्रदीप राणे)
- अस्तित्व (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- आडोसा (हृषीकेश कोळी)
- इतिहास (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- इन सर्च ऑफ (संजय जमखंडी)
- एक क्षण गोठलेला (किरण पवार)
- एका म्हाताऱ्याचा खून (महेश एलकुंचवार)
- एका रात्रीतली गोष्ट (सुभाष नारायण)
- ओश्तोरीज (हृषीकेश कोळी)
- काहूर (शफाअतखान)
- कुंकू टिकली आणि टॅटू ! (हृषीकेश कोळी)
- कोंडी (हृषीकेश कोळी)
- खोटं नाटक (वृंदावन दंडवते)
- गिरगांव व्हाया दादर (हृषीकेश कोळी)
- संगीत घागरे के पिछे (संजय जमखंडी)
- घोटभर पाणी (प्रेमानंद गज्वी)
- चिऊताई, चिऊताई दार उघड (प्रदीप राणे)
- छिन्न (वामन तावडे)
- जय जय रामकृष्ण हरी (हृषीकेश कोळी)
- झुलता पूल (सतीश आळेकर)
- टाकीचे गाव (सुभाष नारायण)
- दस्तुरखुद्द (हृषीकेश कोळी)
- देव नवरी (प्रेमानंद गज्वी)
- दृष्टी (संजय जमखंडी)
- नाटक बसते आहे (वि. वा. शिरवाडकर)
- पाझर (प्रवीण पाटेकर)
- पांढरा बुधवार (प्रेमानंद गज्वी, हे नाटक [[अमरावती][ विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
- पाणीपुरी (श्रीपाद देशपांडे)
- पिकनिक (संजय जमखंडी)
- पुढारी (वृंदावन दंडवते)
- प्रवाहनाद (किरण पवार)
- फिलिप (दर्शन पाटील)
- बसस्टॉप (सतीश आळेकर)
- बेरीज-वजाबाकी (प्रेमानंद गज्वी)
- भजन (सतीश आळेकर)
- भिंत (सतीश आळेकर)
- भूक - एक अंतिम सत्य (किरण पवार)
- मडवॉक (श्रीपाद देशपांडे)
- मद्रासीने केला मराठी भ्रतार (वसंत कानेटकर)
- मधुमोह (हृषीकेश कोळी)
- मध्यमपदलोपी (दत्ता पाटील)
- मन पिंजऱ्याचे (दिलीप परदेशी)
- मॅनिया (दत्ता पाटील)
- महाद्वार (दिलीप परदेशी)
- माईक (संदीप दंडवते)
- माझं अाभाळ (दत्ता पाटील)
- माझी गोष्ट (सुहास तांबे)
- मुस्काट (हृषीकेश कोळी)
- मोजलेम (हृषीकेश कोळी)
- मोर्चा (हृषीकेश कोळी)
- यमूचे रहस्य (सतीश आळेकर)
- यातनाघर (महेश एलकुंचवार)
- रक्तबीज (महेश एलकुंचवार)
- रात्र थोडी सोंगे फार (हृषीकेश कोळी)
- रायाची राणी (वामन तावडे)
- रेनमेकर (प्राजक्त देशमुख)
- वळण (सतीश आळेकर)
- श्यामची आई (स्वप्नील जाधव)
- संगीत घागरे के पिछे (संजय जमखंडी)
- समुदाय (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- संवाद हरवलेली माणसं (संदीप शितोळे)
- सुलतान (महेश एलकुंचवार)
- स्वप्न (संदीप शितोळे)
- हिस्टरी ऑफ लिजंड्स (हृषीकेश कोळी)
- हिय्या (संदीप दंडवते)
- होळी (महेश एलकुंचवार)
- हौसफुल्ल (हृषीकेश कोळी)
तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या काही दर्जेदार नवीन एकांकिका
अफू, आफ्टर द डायरी, आम्ही एकांकिका करत नाही!, आपल्यातले आणि त्यांच्यातले, आम्ही नसू लाडके, इन सर्च ऑफ, उत्खनन, ए.एस.एल. प्लीज, एक एप्रिल, एक्स, ओवी, क म्हणजे करमणूक, कस्टमर केअर, कुरूप, केऑस, खंडणी, घोरपडेंच्या बैलाला घो, चिअर्स, चिलखतराज जगन्नाथ, जस्ट फॉर यू, जून जुलै, जेवणावळ, ट्रुथ ॲन्ड अदरवाईज, डिफेन्स रेस्ट, तुझा माझ्यावर भरवसा नाय का, तुम्ही आम्ही आपण सारे, दप्तर, देवबाभळी, दोन शूर, दृष्टी, धर्मसंग्राम, नाहीतर फुकट, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, पाऊसपाड्या, पॉज, पाझर, पाहुणचार, फॅमिली बिझनेस, फिलिप, बत्ताशी, बा.जी. राव, बाभुळगावचा जहागीरदार, बायकांत पुरुष लांबोडा, बोलट, ब्लादेन चक्क लेलेंकडे, भवरा, भक्षक, भूमिका, मडवॉक, माइक. माणसं, माणूसस्पर्श, मुस्काट, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, यज्ञाहुती, लेखकाचा कुत्रा, वन बॉल टु गो!!!, वाली, वास इज दास, विभवांतर, वेटिंग फॉर गोदो, वेटिंग फॉर सुपरमॅन, वेठबिगार, वेताळाची गोष्ट, शुभयात्रा, श्यामची आई, सत्यम शिवम सुंदरम, सहर एक पहाट, सांगायचं नाही हं, सॉरी परांजपे (लेखक चिन्मय देव), सिटीलाईट, सेल्फी, १६५०, स्लॅब बॉक्स, स्वच्छतेच्या नावानं चांगभलं, हार्दिक शुभेच्छा, इत्यादी
रंगमंचावर एकांकिका सादर करणाऱ्या नाट्यसंस्था
- अंकुर प्रतिष्ठान
- अनुभूती (मुंबई)
- अभिनय (कल्याण)
- नाट्यसागर (ठाणे)
- अश्वमेध थिएटर्स (नाशिक)
- अस्तित्व मेकर्स (सोलापूर)
- आकृती कलामंच
- आम्ही नाटककार (मुंबई)
- आमचे आम्ही (पुणे)
- इंद्रायणी कलामंच (वडगाव मावळ)
- कलाविश्व (मुंबई)
- कल्पक नाट्य
- DGMC रंगभूमी (मुंबई)
- क्रिएशन, पुणे - नवोदित कलाकारांना संधी देणारी पुण्यातील नाट्यसंस्था
- कोलाज क्रिएशन्स (पुणे)
- जिराफ थिएटर ( मुंबई)
- द जीनिअस (नाशिक)
- झिरो बजेट (मुंबई)
- प्रयोजन (कल्याण)
- नाट्यमय (ठाणे)
- निर्मिती रंगमंच (अहमदनगर)
- टिम आर - (ठाणे)
- पंचमवेद
- पेज टू स्टेज
- प्रभद्र एन्टरटेनमेंट
- ब्लॅक बॉक्स
- मल्हार नाट्य, अहमदनगर
- मायमराठी कला मंडळ ( हडपसर )
- मितिचार (कल्याण)
- रंग (पुणे)
- रंगश्री नाट्यसंस्था (विटा)
- वेद युवा प्रतिष्ठान (अकोला)
- शाश्वत (पुणे)
- सप्तक (पुणे)
- समर्थ
- सौंदर्य निर्मिती (नाशिक)
- रूईया नाट्यवलय (मुंबई)
- स्टेज ड्रीम्स प्रॉडक्शन
- स्वप्न (पुणे) : या संस्थेने व्यावसायिक रंगमंचावर एकाच दिवशी व एकापाठोपाठ ‘चिलखतराज जगन्नाथ’,‘निरोप’, आणि ‘सारे जहाँसे कच्चा’ या तीन एकांकिका प्रथमच सादर केल्या (ऑगस्ट २०१२). त्यांत तीस नवोदित कलावंतांनी भाग घेतला होता.
- स्वरगंध संस्था (पिंपरी-चिंचवड, पुणे)
एकांकिकांचे नवे लेखक
- हर्शल अल्पे
- विशाल कदम
- इरावती कर्णिक
- हृषिकेश कोळी
- प्रेमानंद गज्वी
- संजय जमखंडी
- स्वप्निल जाधव
- प्रशांत जोशी
- प्रवीण तरडे
- संदीप दंडवते
- गिरीश दळवी
- श्रीपाद देशपांडे
- प्राजक्त देशमुख
- सुभाष नारायण
- गणेश पंडित
- दत्ता पाटील
- इरफान मुजावर
- शिरीष लाटकर
- संदीप शितोळे.
- योगेश शेजवलकर
- संभाजी सावंत
- योगेश सोमण
- अंबर हडप
एकांकिकांचे दिग्दर्शक
- अद्वैत दादरकर
- अनिकेत पाटील
- अनिल बांदिवडेकर
- अमोल भोर
- अक्षय दत्त
- गिरीश पतके
- प्रल्हाद कुडतरकर.
- मकरंद घोडके
- विपुल महागावकर
- सचिन शिंदे
- संदीप दंडवते
- संजय जमखंडी
- सुनील हरिश्चंद्र
- सुभाष नारायण
- हृषीकेश कोळी
- अभिजित झुंजारराव
- साबा राऊत
- अजय कांबळे
मराठी भाषेतील एकांकिकांच्या स्पर्धा घेणाऱ्या संस्था
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सातारा शाखा आयोजित राज्यस्तरीय समर्थ करंडक एकांकिका स्पर्धा.
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा (पु.ल. देशपांडे महाकरंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण (राम गणेश गडकरी करंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई (विष्णुदास भावे करंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा (राम गणेश गडकरी करंडक)
- अद्वैत एकांकिका स्पर्धा, सेठ जी.एस. (गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे
- ॲमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
- अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
- अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
- अमृतकुंभ एकांकिका स्पर्धा, मुंबई
- अवतरण एकांकिका, आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा, मुंबई(?)
- अस्तित्व आयोजित कल्पना एक आविष्कार अनेक (मराठी एकांकिका स्पर्धा).
- अस्तित्व हिंदी-मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई
- आम्ही नूमविय एकांकिका करंडक स्पर्धा, पुणे
- आय.एन.टी (इंडियन नॅशनल थिएटर) मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई (प्रवीण जोशी करंडक)
- आय.एन.टी (इंडियन नॅशनल थिएटर) हिंदी-मराठी-गुजराती एकांकिका स्पर्धा, मुंबई
- आय.पी.टी.ए.-इप्टाच्या (इंडियन पीपल्स थिएटरच्या) हिंदी एकांकिका स्पर्धा
- उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई
- उत्तुंग एकांकिका स्पर्धा (खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा)
- उन्मेष एकांकिका स्पर्धा
- एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई
- कराड अर्बन बँक सेवक संघ, कर्हाड आयोजित (कराड अर्बन बँक करंडक) स्पर्धा
- कला व संस्कृती संचालनालय, गोवा आयोजित स्पर्धा (वेताळेश्वर करंडक)
- कीर्ति महाविद्यालय, मुंबईतर्फे आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सव अंतरंग स्पर्धा
- गोमंतक मराठी अकादमी, कांदोळी-बारदेश, गोवा
- चतुरंग - सवाई
- चैतन्य करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली
- जिभाऊ करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा, नंदुरबार
- डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या कलारंग एकांकिका स्पर्धा (ज्ञानसाधना करंडक, पुष्पलता डी. पाटील करंडक)
- ठाणे महापालिकेच्या, ठाणे महापौर करंडक एकांकिका स्पर्धा
- दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक)
- दिलीप प्रभावळकर एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई
- दैनिक लोकसत्ता (लोकांकिका), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे
- दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक)
- नाट्यांगण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, मिरज
- पाली करंडक स्पर्धा, मुंबई
- पुणे जिल्हा परिषद , शिक्षण विभाग आयोजित..(यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा. )
- पुरुषोत्तम करंडक, पुणे
- बृहन्मुंबई महानगर पालिका कामगार विभाग कामगार कल्याण केंद्रांतर्गत एकांकिका स्पर्धा
- भारतीय विद्या भवन, मुंबई - एकांकिका स्पर्धा
- मराठवाडा मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा
- महाबँक रंगदक्षिणी स्पर्धा, बंगलोर
- महाराष्ट्र कलोपासक, पुणे (पुरुषोत्तम करंडक)
- मिलिंद कला मंडळ, बाप्टी रोड, मुंबई
- मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई
- राज करंडक स्पर्धा, पुणे
- राज्यस्तरीय औद्योगिक आणि व्यावसायिक कामगार नाट्यस्पर्धा
- लोकांकिका एकांकिका स्पर्धा (दैनिक लोकसत्तातर्फे), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे
- वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
- शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
- सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृति करंडक)
- सवाई एकांकिका स्पर्धा, चतुरंग प्रतिष्ठान (मुंबई) : सुरुवात १९८८मध्ये
- सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक)
- सेठ जी.एस.(गोरधनदास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम. (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’
- स्वागताध्यक्ष खासदार करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
- स्वाभिमान संघटना पुणे आयोजित एकांकिका स्पर्धा
- ज्ञानक्रांती शैक्षणिक व सामाजिक संस्था, पाषाण, पुणे (ज्ञानक्रांती करंडक)
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/entertainment/one-act-play/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - [१]