"दीक्षाभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७५: ओळ ७५:
[[चित्र:Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg|इवलेसे|[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने]]
[[चित्र:Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg|इवलेसे|[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने]]
दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ आक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] म्हणून उत्साहाने साजरा करतात. या येथे १५ ते २० लाख बौद्ध एकत्र जमा होतात आणि बाबासाहेब आनि बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील विषेशत महाराष्ट्रातील मुख्य राजकिय न्ते सणात सहभागी होतात, तसेच जर्मनी, थायलंड, जापान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध उपासक, भिक्खु सहभागी होतात.
दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ आक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] म्हणून उत्साहाने साजरा करतात. या येथे १५ ते २० लाख बौद्ध एकत्र जमा होतात आणि बाबासाहेब आनि बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील विषेशत महाराष्ट्रातील मुख्य राजकिय न्ते सणात सहभागी होतात, तसेच जर्मनी, थायलंड, जापान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध उपासक, भिक्खु सहभागी होतात.

== दीक्षाभूमीस भेट देणारे प्रसिद्ध व्यक्ती ==
दीक्षाभूमीस अनेक प्रसिद्ध भारतीय व परदेशी व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत. त्यातील काही व्यक्ती पुढीलप्रमीणे —
* [[दलाई लामा]]
* [[नरेंद्र मोदी]]
* [[अजय देवगन]]
* [[बाबा रामदेव]]
* [[अमित शहा]]
* [[महेंद्र राजपक्षे]]


== चित्र दालन ==
== चित्र दालन ==

०८:५३, २७ मे २०१७ ची आवृत्ती

दीक्षाभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण नागपुर, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात जुलै १९७८
पूर्ण १८ डिसेंबर २००१
ऊंची
वास्तुशास्त्रीय स्तूप
बांधकाम
वास्तुविशारद शे डान मल, शशी शर्मा


दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे इ.स. १९५६ साली लाखों अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे जगभरातून आणि भारतभरातून लाखोंच्या बौद्ध अनुयायी येथे येतात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांना अभिवादन करतात.

दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आहे, म्हणून याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दिक्षाभूमी हे संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मींयांचे एक अतिशय महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. भारतातील व विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तिंनी या स्थळास भेटी दिलेल्या आहेत.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खु सुरई ससाई यांनी म्हटले की, “दीक्षाभूमी जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील”.[१]

इतिहास

सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि बौद्ध इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

विसाव्या शतकात १४ आक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,०००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म दीक्षा दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्ध धर्मींयांचे व आंबेडकरवाद्यांचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.

बावीस प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत[२] :-

  1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्‍न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्यभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

रचना

दीक्षाभूमीतील आतील बाजू – बुद्ध मूर्तींसमोर बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थीकलश

दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

सण

धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ आक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. या येथे १५ ते २० लाख बौद्ध एकत्र जमा होतात आणि बाबासाहेब आनि बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील विषेशत महाराष्ट्रातील मुख्य राजकिय न्ते सणात सहभागी होतात, तसेच जर्मनी, थायलंड, जापान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध उपासक, भिक्खु सहभागी होतात.

दीक्षाभूमीस भेट देणारे प्रसिद्ध व्यक्ती

दीक्षाभूमीस अनेक प्रसिद्ध भारतीय व परदेशी व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत. त्यातील काही व्यक्ती पुढीलप्रमीणे —

चित्र दालन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ सुरई ससाई
  2. ^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण