"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १०९: | ओळ १०९: | ||
* आय.पी.टी.ए.-इप्टा(इंडियन पीपल्स थिएटर) च्या हिंदी एकांकिका स्पर्धा |
* आय.पी.टी.ए.-इप्टा(इंडियन पीपल्स थिएटर) च्या हिंदी एकांकिका स्पर्धा |
||
* उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई |
* उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई |
||
* उन्मेष एकांकिका स्पर्धा |
|||
* एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई |
* एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई |
||
* कराड अर्बन बँक सेवक संघ, कऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बँक करंडक) स्पर्धा |
* कराड अर्बन बँक सेवक संघ, कऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बँक करंडक) स्पर्धा |
||
ओळ १२०: | ओळ १२१: | ||
* [[दादा कोंडके]] मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक) |
* [[दादा कोंडके]] मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक) |
||
* [[दिलीप प्रभावळकर]] एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई |
* [[दिलीप प्रभावळकर]] एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई |
||
* दैनिक लोकसत्ता (लोकांकिका) |
* दैनिक लोकसत्ता (लोकांकिका), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे |
||
* दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक) |
* दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक) |
||
* नाट्यांगण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, [[मिरज]] |
* नाट्यांगण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, [[मिरज]] |
||
ओळ १२६: | ओळ १२७: | ||
* पुणे जिल्हा परिषद , शिक्षण विभाग आयोजित..(यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा. ) |
* पुणे जिल्हा परिषद , शिक्षण विभाग आयोजित..(यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा. ) |
||
* [[पुरुषोत्तम करंडक]], पुणे |
* [[पुरुषोत्तम करंडक]], पुणे |
||
* बृहन्मुंबई महानगर पालिका कामगार विभाग कामगार कल्याण केंद्रांतर्गत एकांकिका स्पर्धा |
|||
* भारतीय विद्या भवन, मुंबई - एकांकिका स्पर्धा |
|||
* [[मराठवाडा]] मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा |
* [[मराठवाडा]] मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा |
||
* महाबँक रंगदक्षिणी स्पर्धा, बंगलोर |
* महाबँक रंगदक्षिणी स्पर्धा, बंगलोर |
||
ओळ १३२: | ओळ १३५: | ||
* मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई |
* मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई |
||
* [[राज करंडक]] स्पर्धा, पुणे |
* [[राज करंडक]] स्पर्धा, पुणे |
||
* राज्यस्तरीय औद्योगिक आणि व्यावसायिक कामगार नाट्यस्पर्धा |
|||
* [[लोकांकिका स्पर्धा|लोकांकिका एकांकिका स्पर्धा]] (दैनिक लोकसत्तातर्फे) |
* [[लोकांकिका स्पर्धा|लोकांकिका एकांकिका स्पर्धा]] (दैनिक लोकसत्तातर्फे), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे |
||
* वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘ |
* वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘ |
||
* शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, [[अहमदनगर]] |
* शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, [[अहमदनगर]] |
||
* सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृति करंडक) |
* सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृति करंडक) |
||
* सवाई स्पर्धा, मुंबई |
* सवाई एकांकिका स्पर्धा, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई) |
||
* सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’ |
* सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’ |
||
* सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक) |
* सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक) |
००:५७, १६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानकाची एकता साधणार्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणार्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळातमात्र हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.
एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजके संवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.
मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकर्यांचे 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा.वि. वरेरकर, मो.ग.रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.
इ.स. १९५० मध्ये भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर होतात.
काही प्रसिद्ध एकांकिका
अनुवादित :
- अभ्यास (शं.ना. नवरे)
- कदाचित (पु.ल. देशपांडे)
- खुर्च्या (वृंदावन दंडवते)
- जनावर (शं.ना. नवरे), वगैरे.
स्वतंत्र :
- अॅश इज बर्निंग (प्रदीप राणे)
- अस्तित्व (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- इतिहास (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- एका म्हातार्याचा खून (महेश एलकुंचवार)
- काहूर (शफाअतखान)
- खोटं नाटक (वृंदावन दंडवते)
- घोटभर पाणी (प्रेमानंद गज्वी)
- चिऊताई, चिऊताई दार उघड (प्रदीप राणे)
- छिन्न (वामन तावडे)
- झुलता पूल (सतीश आळेकर)
- डिअर पिनाक (सुहास तांबे)
- देव नवरी (प्रेमानंद गज्वी)
- नाटक बसते आहे (वि. वा. शिरवाडकर)
- पुढारी (वृंदावन दंडवते)
- बसस्टॉप (सतीश आळेकर)
- भजन (सतीश आळेकर)
- भिंत (सतीश आळेकर)
- मद्रासीने केला मराठी भ्रतार (वसंत कानेटकर)
- मन पिंजऱ्याचे (दिलीप परदेशी)
- महाद्वार (दिलीप परदेशी)
- माझी गोष्ट (सुहास तांबे)
- यमूचे रहस्य (सतीश आळेकर)
- यातनाघर (महेश एलकुंचवार)
- रक्तबीज (महेश एलकुंचवार)
- रायाची राणी (वामन तावडे)
- वळण (सतीश आळेकर)
- समुदाय (चंद्रकांत प्रभाकर देशपांडे)
- सुलतान (महेश एलकुंचवार)
- होळी (महेश एलकुंचवार)
- एक क्षण गोठलेला (किरण पवार)
- भूक - एक अंतिम सत्य (किरण पवार)
- पाणीपुरी ( श्रीपाद देशपांडे)
- प्रवाहनाद (किरण पवार)
- एका रात्रीतली गोष्ट (सुभाष नारायण)
- रेनमेकर (प्राजक्त देशमुख)
- मॅनिया (दत्ता पाटील)
- मध्यमपदलोपी (दत्ता पाटील)
नवोदित लेखकांच्या एकांकिकांची नावे पुरुषोत्तम करंडक या पानावर वाचायला मिळतील.
तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या काही दर्जेदार नवीन एकांकिका
अफू, आम्ही एकांकिका करत नाही!, आम्ही नसू लाडके, एक एप्रिल, , कस्टमर केअर, चिअर्स, जून जुलै, जेवणावळ, ट्रुथ अॅन्ड अदरवाईज, दोन शूर, दृष्टी, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, बत्ताशी, भक्षक, मडवॉक, मुस्काट, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वन बॉल टु गो!!!, वेटिंग फॉर सुपरमॅन, सिटीलाईट, सहर एक पहाट, सेल्फी, इत्यादी
रंगमंचावर एकांकिका सादर करणार्या नाट्यसंस्था
- अभिनय (कल्याण)
- अश्वमेध थिटरर्स (नाशिक)
- नाट्यमय (ठाणे)
- जिराफ थिएटर ( मुंबई)
- द जीनिअस (नाशिक)
- झिरो बजेट (मुंबई)
- मितीचार (कल्याण)
- स्वप्न (पुणे) : या संस्थेने व्यावसायिक रंगमंचावर एकाच दिवशी व एकापाठोपाठ ‘चिलखतराज जगन्नाथ’,‘निरोप’, आणि ‘सारे जहाँसे कच्चा’ या तीन एकाकिका प्रथमच सादर केल्या (ऑगस्ट २०१२). त्यांत तीस नवोदित कलावंतांनी भाग घेतला होता.
एकांकिकांचे नवे लेखक
- इरावती कर्णिक
- गिरीश दळवी
- दत्ता पाटील
- प्रवीण तरडे
- प्राजक्त देशमुख
- श्रीपाद देशपांडे
- सुभाष नारायण
- हर्शल अल्पे
एकांकिकांचे दिग्दर्शक
- अमोल भोर
- अक्षय दत्त
- मकरंद घोडके
- विपुल महागावकर
- सचिन शिंदे
- सुनिल हरिश्चंद्र
मराठी भाषेतील एकांकिकांच्या स्पर्धा घेणार्या संस्था:
- अद्वैत एकांकिका स्पर्धा, सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा (पु.ल. देशपांडे महाकरंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण(राम गणेश गडकरी करंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई (विष्णुदास भावे करंडक)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा (राम गणेश गडकरी करंडक)
- अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
- अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
- अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
- अमृतकुंभ एकांकिका स्पर्धा, मुंबई
- अवतरण एकांकिका, आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा, मुंबई(?)
- अस्तित्व हिंदी-मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई
- आम्ही नूमविय एकांकिका करंडक स्पर्धा, पुणे
- आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई (प्रवीण जोशी करंडक)
- आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) हिंदी-मराठी-गुजराती एकांकिका स्पर्धा, मुंबई
- आय.पी.टी.ए.-इप्टा(इंडियन पीपल्स थिएटर) च्या हिंदी एकांकिका स्पर्धा
- उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई
- उन्मेष एकांकिका स्पर्धा
- एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई
- कराड अर्बन बँक सेवक संघ, कऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बँक करंडक) स्पर्धा
- कला व संस्कृती संचालनालय, गोवा आयोजित स्पर्धा (वेताळेश्वर करंडक)
- कीर्ति महाविद्यालय, मुंबईतर्फे आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सव अंतरंग स्पर्धा
- गोमंतक मराठी अकादमी, कांदोळी-बारदेश, गोवा
- चैतन्य करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली
- जिभाऊ करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा, नंदुरबार
- डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या कलारंग एकांकिका स्पर्धा (ज्ञानसाधना करंडक, पुष्पलता डी. पाटील करंडक)
- ठाणे महापालिकेच्या, ठाणे महापौर करंडक एकांकिका स्पर्धा
- दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक)
- दिलीप प्रभावळकर एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई
- दैनिक लोकसत्ता (लोकांकिका), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे
- दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक)
- नाट्यांगण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, मिरज
- पाली करंडक स्पर्धा, मुंबई
- पुणे जिल्हा परिषद , शिक्षण विभाग आयोजित..(यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा. )
- पुरुषोत्तम करंडक, पुणे
- बृहन्मुंबई महानगर पालिका कामगार विभाग कामगार कल्याण केंद्रांतर्गत एकांकिका स्पर्धा
- भारतीय विद्या भवन, मुंबई - एकांकिका स्पर्धा
- मराठवाडा मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा
- महाबँक रंगदक्षिणी स्पर्धा, बंगलोर
- महाराष्ट्र कलोपासक, पुणे (पुरुषोत्तम करंडक)
- मिलिंद कला मंडळ, बाप्टी रोड, मुंबई
- मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई
- राज करंडक स्पर्धा, पुणे
- राज्यस्तरीय औद्योगिक आणि व्यावसायिक कामगार नाट्यस्पर्धा
- लोकांकिका एकांकिका स्पर्धा (दैनिक लोकसत्तातर्फे), पुणे-मुंबई-सोलापूर-इस्लामपूर-बारामती आदी आठ केंद्रे
- वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
- शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
- सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृति करंडक)
- सवाई एकांकिका स्पर्धा, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई)
- सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’
- सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक)
- स्वागताध्यक्ष खासदार करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
- स्वाभिमान संघटना पुणे आयोजित एकांकिका स्पर्धा
- ज्ञानक्रांती शैक्षणिक व सामाजिक संस्था, पाषाण, पुणे (ज्ञानक्रांती करंडक)
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/entertainment/one-act-play/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - [१]