Jump to content

"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६: ओळ ४६:
* सुलतान ([[महेश एलकुंचवार]])
* सुलतान ([[महेश एलकुंचवार]])
* होळी ([[महेश एलकुंचवार]])
* होळी ([[महेश एलकुंचवार]])
* एक क्षण गोठलेला (किरण पवार)
* एक क्षण गोठलेला ([[किरण पवार]])
* भूक - एक अंतिम सत्य (किरण पवार)
* भूक - एक अंतिम सत्य ([[किरण पवार]])
* प्रवाहनाद (किरण पवार)
* प्रवाहनाद ([[किरण पवार]])
* एका रात्रीतली गोष्ट (सुभाष नारायण)
* एका रात्रीतली गोष्ट (सुभाष नारायण)
नवोदित लेखकांच्या एकांकिकांची नावे [[पुरुषोत्तम करंडक]] या पानावर वाचायला मिळतील.
नवोदित लेखकांच्या एकांकिकांची नावे [[पुरुषोत्तम करंडक]] या पानावर वाचायला मिळतील.


==तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या नवीन एकांकिका==
==तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या नवीन एकांकिका==
एक एप्रिल, चिअर्स, जेवणावळ, ट्रुथ ॲन्ड अदरवाईज, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन, आम्ही एकांकिका करत नाही!, वन बॉल टु गो!!!
एक एप्रिल, चिअर्स, जेवणावळ, ट्रुथ अॅन्ड अदरवाईज, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन, आम्ही एकांकिका करत नाही!, वन बॉल टु गो!!!


==रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या नाट्यसंस्था==
==रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या नाट्यसंस्था==
ओळ ७८: ओळ ७८:
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा ([[राम गणेश गडकरी]] करंडक)
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा ([[राम गणेश गडकरी]] करंडक)
* ॲमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
* अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
* अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
* अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
* अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
* अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
ओळ ११०: ओळ ११०:
* मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई
* मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई
* [[राज करंडक]] स्पर्धा, पुणे
* [[राज करंडक]] स्पर्धा, पुणे
* [[लोकांकिका स्पर्धा|लोकांकिका एकांकिका स्पर्धा]] (दैनिक लोकसत्तातर्फे)
* वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
* वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
* शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, [[अहमदनगर]]
* शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, [[अहमदनगर]]

२२:५५, १० डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानकाची एकता साधणार्‍या, प्रभावी व्यक्तिरेखा असणार्‍या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळातमात्र हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.

एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजके संवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.

मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकऱ्यांचे 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा.वि. वरेरकर, मो.ग.रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.

इ.स. १९५० मध्ये भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर होतात.

काही प्रसिद्ध एकांकिका

अनुवादित :

स्वतंत्र :

नवोदित लेखकांच्या एकांकिकांची नावे पुरुषोत्तम करंडक या पानावर वाचायला मिळतील.

तितक्याश्या प्रसिद्ध नसलेल्या नवीन एकांकिका

एक एप्रिल, चिअर्स, जेवणावळ, ट्रुथ अॅन्ड अदरवाईज, नूपुरी, पंचकर्म, पडद्यामागचा घोळ, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन, आम्ही एकांकिका करत नाही!, वन बॉल टु गो!!!

रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या नाट्यसंस्था

  • स्वप्न (पुणे) : या संस्थेने व्यावसायिक रंगमंचावर एकाच दिवशी व एकापाठोपाठ ‘चिलखतराज जगन्‍नाथ’,‘निरोप’, आणि ‘सारे जहाँसे कच्चा’ या तीन एकाकिका प्रथमच सादर केल्या (ऑगस्ट २०१२). त्यांत तीस नवोदित कलावंतांनी भाग घेतला होता.

एकांकिकांचे आधुनिक लेखक

एकांकिकांचे दिग्दर्शक

  • अक्षय दत्त
  • विपुल महागावकर
  • मकरंद घोडके
  • अमोल भोर
  • सुनिल हरिश्चंद्र

मराठी भाषेतील एकांकिकांच्या स्पर्धा घेणार्‍या संस्था:

  • अद्वैत एकांकिका स्पर्धा, सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा (पु.ल. देशपांडे महाकरंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण(राम गणेश गडकरी करंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई (विष्णुदास भावे करंडक)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिक आयोजित अनंत कुबल एकांकिका स्पर्धा
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा (राम गणेश गडकरी करंडक)
  • अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे (कोकण करंडक)
  • अमर हिंद मंडळ, दादर यांची कै. आबा पडते एकांकिका स्पर्धा
  • अमर हिंद मंडळ दादर आयोजित, सांस्कृतिक अमावास्या (दर अमावास्येला एकांकिकांच्या रंगीत तालमी)
  • अमृतकुंभ एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • अवतरण एकांकिका, आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा, मुंबई(?)
  • अस्तित्व हिंदी-मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • आम्ही नूमविय एकांकिका करंडक स्पर्धा, पुणे
  • आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) मराठी एकांकिका स्पर्धा, मुंबई (प्रवीण जोशी करंडक)
  • आय.एन.टी(इंडियन नॅशनल थिएटर) हिंदी-मराठी-गुजराथी एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • आय.पी.टी.ए.-इप्टा(इंडियन पीपल्स थिएटर) च्या हिंदी एकांकिका स्पर्धा
  • उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई
  • कराड अर्बन बँक सेवक संघ, कऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बँक करंडक) स्पर्धा
  • कला व संस्कृती संचालनालय, गोवा आयोजित स्पर्धा (वेताळेश्वर करंडक)
  • कीर्ति महाविद्यालय, मुंबईतर्फे आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सव अंतरंग स्पर्धा
  • गोमंतक मराठी अकादमी, कांदोळी-बारदेश, गोवा
  • चैतन्य करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली
  • जिभाऊ करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा, नंदुरबार
  • डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या कलारंग एकांकिका स्पर्धा (ज्ञानसाधना करंडक, पुष्पलता डी. पाटील करंडक)
  • ठाणे महापालिकेच्या, ठाणे महापौर करंडक एकांकिका स्पर्धा
  • दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक)
  • दिलीप प्रभावळकर एकांकिका स्पर्धा,नवी मुंबई
  • दैनिक सकाळ. औरंगाबाद, कल्याण, जळगांव, पुणे, मुंबई वगैरे (सकाळ करंडक)
  • नाट्यांगण राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, मिरज
  • पाली करंडक स्पर्धा, मुंबई
  • पुरुषोत्तम करंडक, पुणे
  • मराठवाडा मित्रमंडळ आयोजित बाल एकांकिका स्पर्धा
  • महाबँक रंगदक्षिणी स्पर्धा, बंगलोर
  • महाराष्ट्र कलोपासक, पुणे (पुरुषोत्तम करंडक)
  • मिलिंद कला मंडळ, बाप्टी रोड, मुंबई
  • मृगजळ एकांकिका स्पर्धा (साठ्ये आणि डहाणूकर कॉलेज माजी विद्यार्थी संघातर्फे), मुंबई
  • राज करंडक स्पर्धा, पुणे
  • लोकांकिका एकांकिका स्पर्धा (दैनिक लोकसत्तातर्फे)
  • वेध थिएटर्स आयोजित ’माय बाबा मराठी एकांकिका स्पर्धा‘
  • शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
  • सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृति करंडक)
  • सवाई स्पर्धा, मुंबई
  • सेठ जी.एस.(गोविंददास सुंदरदास) मेडिकल कॉलेज व के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालय, मुंबई यांच्यातर्फे ‘अद्वैत एकांकिका स्पर्धा’
  • सहमती पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कलादर्शन स्पर्धा (फिरोदिया करंडक)
  • स्वागताध्यक्ष खासदार करंडक एकांकिका स्पर्धा, अहमदनगर
  • स्वाभिमान संघटना पुणे आयोजित एकांकिका स्पर्धा
  • ज्ञानक्रांती शैक्षणिक व सामाजिक संस्था, पाषाण, पुणे (ज्ञानक्रांती करंडक) - [ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३ http://www.marathimati.com/News/dnyankranti-karandak-pune-2013.asp]

बाह्य दुवे

  • http://www.marathimati.com/entertainment/one-act-play/. Missing or empty |title= (सहाय्य)