Jump to content

विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पानास सुरक्षीततेची खरेच गरज आहे का ? माझ्या सारखे नवीन सदस्य यात लगेच मत प्रदर्शन करू शकत नाहीत.

[संपादन]
येथे पाने सुरक्षीत करण्याचा नेमका क्रम आणि प्रक्रीय कशी असते ?, पानाच्या इतिहासात कुणी स्पॅमींग केल्याचे उदाहरणही नाही. त्या शिवाय लेख निवडला गेल्या नंतर सुऱक्षीत करणे समजण्या सारखे आहे , हा लेख सुरक्षीत असण्या मागचे गमक समजेले नाही, अर्धसुरक्षीत असेल तर त्याचाही बोध होत नाही.प्रबंधकांनी साईन आउटकरून अशा पानांना भेट देऊन पहावी म्हणजे अडचणी लक्षात येतील
  • या सदराकरिता मला खंडोबा या पानाचे नामनिर्देशन करावयाचे आहे संकेत १४:३९, १४ फेब्रुवारी २०११ (UTC)
संकेत,
सहसा विकिपीडियातील कौलपाने अर्धसुरक्षित असण्याचा संकेत आहे. असे नसल्यास एखाद्या कौलासाठी भाराभर नवीन सदस्यखाती उघडून तो कौल आपल्याबाजूने लावून घेणे सहज शक्य आहे. जरी असे घडले नसले तरी असे घडण्याची वाट बघण्यात हशील नाही हे तुम्हाला मान्य असेलच.
अर्धसुरक्षित केल्याने कोणत्याही दहा दिवसांपूर्वी नोंदणी केलेल्या सदस्याला प्रवेश केल्यावर बदल करता येतात.
जर एखाद्या नवीन सदस्याला मतप्रदर्शन करायचे असल्यास येथे (जसे तुम्ही केलेत) किंवा चावडीवरही संदेश देता येतो. नवीन सदस्यांना संदेश देण्यात अडचण येऊ नये यासाठीच चावडीचे पान सुरक्षित नाही.
तुमचे नामनिर्देशन मी करतो. नऊ दिवसांत तुम्हाला या पानावर, तसेच इतर अर्धसुरक्षित पानांवर बदल करता येतील.
अभय नातू १६:०९, १४ फेब्रुवारी २०११ (UTC)

मला हे पान रिकामे का दिसते ?

[संपादन]
बर्‍याच दिवसांनी आलो तुम्ही मला प्रॉमीस केल्या प्रमाणे पान संपादनाकरता उघडता आले त्याबद्दल धन्यवाद.पण मला ते बाहेरून रिकामे आढळले म्हणून संपादन वर क्लिक केले तर आत गच्च भरलेले होते त्यात माझी विनंती भरली आणि जतन म्हणले पुन्हा तरी मला ते रिकामेच दिसते. माझे कुठे चुकत असेल तर मार्गदर्शन व्हावे.संकेत ०७:१०, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('@अभय नातू:

क्षमस्व! माझ्याकडून काहीतरी तांंत्रिक गडबड झाली आहे.तुम्ही किंंवा अन्य कोणी दुरुस्त करावी ही विनंंती.मी प्रयत्न केला पण काहीतरी चुकत आहे ते करताना माझे.आर्या जोशी (चर्चा)

झाले.' --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:०४, १४ मार्च २०१८ (IST)).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.[reply]


मुखपृष्ठावरील विशेष लेख बदलावा

[संपादन]

सध्या मुखपृष्ठावर आयपीएल २०१६ हा विशेष लेख आहे. हा लेख खूप जुना झालाय आता. २०१६ नंतर आयपीएल चे ६ हंगाम झाले. बरेच दिवस झाले लेख बदलण्यात आला नाही. मी यासाठी काही लेख नामनिर्देशित पण केली आहेत तरी पण विशेष लेख बदलला नाही. यावरून काय समजायचे. कृपया यावरती विचार करावा.

@Usernamekiran @संतोष गोरे @अभय नातू @Tiven2240 Omega45 (चर्चा) ११:५७, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

@अभय नातू:
नोंदीबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता आहात ते बरोबरच आहे. गेले अनेक महिने संपादक लेख तयार करीत आहेत परंतु असलेल्या लेखांचा दर्जा सुधारण्याकडे फारसे लक्ष दिसत नाही आहे.
लेख न बदलण्याचे कारण निर्देशित लेखांमध्ये गरजेचे असलेले बदल होत. तुम्ही निर्देशित केलेल्या लेखांपैकी सगळ्यात चांगल्या प्रतीचा कोणता हे कळवलेत तर सगळ्यांनी मिळून तो सुधारता येईल.
सुधारणा झाल्यावर हा लेख मुखपृष्ठावर प्रदर्शित करता येईल.
अभय नातू (चर्चा) १२:०१, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
ता.क. बृहदेश्वर मंदिर वर काम केल्यास हा लेख थोड्या प्रयत्नांनिशी मुखपृष्ठ सदर करता येईल.
विशेषत: --
१. काही मराठी शब्द पाहिजेत
२. अनेक ठिकाणी व्याकरण बदलून सुटसुटीत वाक्ये पाहिजेत
३. संदर्भ पाहिजेत
@अभय नातू आणि Omega45: हंपी हा लेख सुद्धा दर्जेदार आहे. बृहदेश्वर मंदिर किंवा हंपी ह्या दोन्ही लेखांचे समीक्षण करून एक लेख निवडता येईल. नंतर एक किंवा दोन-तीन महिन्यानंतर दुसरा लेख सुद्धा मुखपृष्ठावर दाखवता येईल. Nitin.kunjirAditya tamhankar हे दोघे लेख वाढवण्यात सक्रिय आहेत, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा मदतनीय राहील. —usernamekiran (talk) १४:५८, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
मी वरील बाबींमध्ये बृहदेश्वर मंदिर या लेखात आज काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण आपले मत सादर करावे--Omega45 (चर्चा) १९:०३, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
धन्यवाद. मला वाटते हंपी लेखात अधिक माहिती आणि तपशील आहे. त्यावर जोर दिला तर तो अजून चांगला उमेदवार लेख आहे. हंपीमध्ये वरीलप्रमाणे सुधारणा पाहिजेत तसेच लाल दुव्यांचे लेखही तयार केले पाहिजेत. मी विरुपाक्ष मंदिरापासून सुरुवात केली आहे.
अभय नातू (चर्चा) ०१:०३, २७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
@अभय नातू मला असे वाटते की हंपी मधील सुधारणा होईपर्यंत बृहदेश्वर मंदिर हा लेख विशेष लेख म्हणून निवडावा. Omega45 (चर्चा) १८:२५, २१ मार्च २०२३ (IST)[reply]

बाबासाहेब आंबेडकर

[संपादन]

नमस्कार, कृपया हे पाहावे. तसेच बाबासाहेब आंबेडकर या लेखाचे चर्चा पान पहाता, मला वाटते हा अती विलंबित प्रस्ताव त्वरित पास करून येत्या १५ एप्रिल पर्यंत यात सुधारणा करून हा लेख सर्व प्रथम मुखपृष्ठ सदर लेख म्हणून प्रकाशित व्हावा असे मला वाटते. सध्या मी आणि संदेश हिवाळे यावर काम करत आहोत.-संतोष गोरे ( 💬 ) १९:२१, २१ मार्च २०२३ (IST)[reply]

नमस्कार, @संतोष गोरे: येथील सुचवलेल्या सर्व सुधारणा बाबासाहेब आंबेडकर लेखामध्ये फार पूर्वीच करून झालेल्या आहेत. मी या संपूर्ण लेखाचे पुनर्लेखन केले आहे आणि प्रचालक अभय नातू यांनी ते लेखन तपासून त्यास बाबासाहेब आंबेडकर लेखामध्ये जोडले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेखामध्ये जवळपास ६०० संदर्भ आहेत, म्हणजेच प्रत्येक बाबीला संदर्भ जोडण्यात आहे. हा मराठी विकिपीडिया वरील अत्यंत दर्जेदार लेख आहे. २०२२ या वर्षातील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या लेखांमध्ये बाबासाहेब आंबेडकर हा लेख पहिल्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये हा लेख मुखपृष्ठ सदर असावा. --संदेश हिवाळेचर्चा २१:५०, २६ मार्च २०२३ (IST)[reply]