Jump to content

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर याद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावरील सदर याद्या ह्या विभागासाठी हे पान आहे. येथे सदर याद्याबदालचे निवडीचे नियम, त्यांना कसे मांडावे, त्यांचे प्रस्ताव व त्या प्रस्तावांवरील चर्चा येथे लेखक करू शकतात.

सदर याद्यांचे निवड निकष

[संपादन]
  • सदर यादी पूर्ण असावी. अपूर्ण याद्या प्रकाशित करण्यास पात्र राहणार नाहीत.
  • यादीतील नोंदींची कमीत कमी किंवा सर्वाधिक संख्या निश्चित नाही परंतु १०पेक्षा अधिक नोंदी असाव्या.
  • यादीतील मुख्य नोंदी निळ्या दुव्याच्या असाव्यात. अपवादांमध्ये, लाल दुवे कमी संख्येत असल्यास (~२०% किंवा कमी) त्यांना अनुमती दिली जाईल.
  • यादीसोबत, यादीबद्दल एक लहान परिच्छेद तुमच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट केला पाहिजे. हा परिच्छेद मुख्यपृष्ठावर दिसेल.
  • यादीसाठी विनामूल्य आणि योग्य चित्र असल्यास, तुम्ही त्या यादीच्या पृष्ठावर आणि प्रस्तावनामध्ये देखील समाविष्ट करू शकता. अशी चित्रे कॉमन्सवर सापडतील.

सदर याद्यांचे प्रस्ताव

[संपादन]

विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभाअसून एकूण ३१ भारतीय मुख्यमंत्री आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हे राज्यप्रमुख असून त्यांचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला/युतीला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतात. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.

फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे १४ मुख्यंत्री आहेत व त्यानंतर काॅंग्रेसचे ३ मुख्यमंत्री आहेत. १३ फेब्रुवारी २०२५ पासून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची जागा रिकामी आहे. ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी दोन महिला आहे; ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल, चित्रीत) आणि रेखा गुप्ता (दिल्ली). मे २०११ पासून पदस्थ असलेल्या बॅनर्जी ह्या सध्या सर्वाधिक काळ विद्यमान आहे (&0000000000000014.000000१४ वर्षे, &0000000000000335.000000३३५ दिवस). विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (वय ४६) हे सर्वात कमी वयाचे तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (वय ८०) सर्वात वयस्कर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्वाधिक असे नऊ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (पूर्ण यादी...)

पाठिंबा - Dharmadhyaksha

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

[संपादन]
बिमल रॉय
बिमल रॉय

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलीवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. पहिला फिल्मफेर पुरस्कार २१ मार्च १९५४ रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये १९५३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला आणि तेव्हापासून ह्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. १९५८ पर्यंत, इतर कोणत्याही नामांकनाची घोषणा करण्यात आली नव्हती आणि फक्त विजेत्याला थेट पुरस्कार देण्यात येत होते.

या श्रेणीतील पहिले विजेते बिमल रॉय (चित्रीत) होते ज्यांना दो बिघा जमीन या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. रॉययांनी हा पुरस्कार सर्वधिक ७ वेळा जिंकला असून (७ नामांकनांमधून) यश चोप्रा यांना सर्वाधिक वेळा असे १२ नामांकन (४ पुरस्कार) मिळाले आहे. रॉय यांच्या खालोखाल संजय लीला भन्साळी (५), यश चोप्रा (४) आणि राज कपूर (४) ह्यांना पुरस्कार मिळाले आहे. महेश भट्ट यांना ६ नामांकन मिळून एकही पुरस्कार मिळाला नाही. एकाच वर्षात दोन नामांकन मिळवणारे असे ३ दिग्दर्शक आहेत: १९७४ मध्ये गुलजार (अचानक आणि कोशिश), १९७७ मध्ये बासू चॅटर्जी (छोटी सी बात आणि चितचोर) आणि १९८० मध्ये हृषिकेश मुखर्जी (गोल माल आणि जुर्मना); परंतु त्यांना या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले नाहीत. १९८५ मध्ये सई परांजपेंना त्यांच्या स्पर्श चित्रपतासाठी पुरस्कार मिळाला व त्या पहिल्या महिला विजेत्या झाल्या. २०२४ मध्ये १२वी फेल या चित्रपटासाठी विधू विनोद चोप्रा यांना नवीनतम पुरस्कार मिळाला आहे. (पूर्ण यादी...)

पाठिंबा - Dharmadhyaksha