लवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लवण : अम्‍लाची क्षाराबरोबर विक्रिया झाल्यास तयार होणाऱ्या पदार्थाला रसायनशास्त्रात लवण म्हणतात. क्षारकाचा घन आयन ( विद्युत् भरित अणू वा अणुगट) व अम्‍लाचा ऋण आयन यांनी लवण बनलेले असते. अम्‍ल व क्षारक यांतील रासायनिक विक्रियेला उदासिनीकरण विक्रिया म्हणतात. विरघळलेल्या वा वितळलेल्या अवस्थेत बहुतेक लवाणांचे घन व ऋण भारित आयनांत पूर्णपणे वियोजन होते. आणि त्यामुळे या अवस्थांत ती चांगली विद्युत् संवाहक असतात. [ ⟶ अम्‍ले व क्षारक; उदासिनीकरण ].[१]


मीठ (NaCI), नवसागर (NH4CI), टाकणखार (Na2 B4 O7 l0 H2 O), खाण्याचा (NaHCO3), व धुण्याचा सोडा (Na2CO3), तुरटी [ KAI (SO4)2 . 12 H2O ]. ही लवणांची सामान्य उदाहरणे होत. लवणांचे अस्तित्व वनस्पती, प्राणी व खनिज या तिन्ही सृष्टींमध्ये आढळते. ती नैसर्गिकउद्गमांपासून वेगळी करून किंवा उपलब्ध कच्च्या मालापासून रासायनिक विक्रियांनी मिळविली जातात. त्यांच्या निर्मितीसाठी अनेक रासायनिक विक्रिया उपयोगी पडतात; उदा., घटक मूलद्रव्यांचा संयोग घडवून; धातू व अम्‍ल यांच्या रासायनिक विक्रियेने; धातूचे ऑक्साइड, हायड्रॉक्साइड, कार्बोनेट अथवा सल्फाइड यांवर समुचित अम्‍लाची विक्रिया करून अथवा योग्य अशा दोन लवणांचा परस्पर विक्रियांनी (उदा., सिल्व्हर क्कोराइडासाठी सिल्व्हर नायट्रेट व सोडियम क्कोराइड यांमधील विक्रियेने ).[१]


***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***

संदर्भ[संपादन]

  1. a b दातार, दि. श्री.;; केळकर, गो. रा. ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) ((पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) आवृत्ती.). महाराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. पान क्रमांक ? Extra |pages= or |at= (सहाय्य). आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). ३०, सप्टेंबर २०१५ रात्रौ १२ ०५ रोजी पाहिले. "पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे : "रासायनिक परिभाषेत याला सोडियम क्लोराइड म्हणतात." ...."रासायनिक सूत्र NaCl. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे.""  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)