वाताकर्ष
तारकासमूह | |
वाताकर्ष मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Ant |
---|---|
प्रतीक | हवेचा पंप[१] |
विषुवांश |
०९h २७m ०५.१८३७s– ११h ०५m ५५.०४७१s[२] |
क्रांती |
−२४.५४२५१८६°– −४०.४२४६२१६°[२] |
क्षेत्रफळ | २३९ चौ. अंश. (६२वा) |
मुख्य तारे | ३ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ९ |
ग्रह असणारे तारे | २ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ० |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | २ |
सर्वात तेजस्वी तारा | α Ant (४.२५m) |
सर्वात जवळील तारा |
डीईएन १०४८-३९५६[३] (१३.१७ ly, ४.०४ pc) |
मेसिए वस्तू | ० |
उल्का वर्षाव | नाही |
शेजारील तारकासमूह |
वासुकी होकायंत्र नौशीर्ष नरतुरंग |
+४५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. एप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
वाताकर्ष (इंग्रजी: Antlia - अँटलिया) दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. याच्या इंग्रजी नावाचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये पंप असा होतो आणि याला हवेच्या पंपाच्या रूपात दर्शवले जाते. निकोलाय लुई दे लाकाय यांनी १८व्या शतकामध्ये हा शोधून काढला. पृथ्वीवरील ४९ अंश उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील भागामधून हा तारकासमूह दिसतो.
वर्णन
[संपादन]खगोलाचा २३८.९ चौरस अंश (०.५७९%) भाग व्यापणारा हा वाताकर्ष नावाचा तारकासमूह आकाराच्या क्रमवारीमध्ये आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये ६२व्या क्रमांकावर आहे.[४] (संपूर्ण आकाशाचे क्षेत्रफळ ४१,२५३ चौरस अंश आहे.) या तारकापुंजाचे स्थान उत्तर गोलार्धात असल्यामुळे ४९ अंश उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील भागामधून हा तारकासमूह दिसतो.[४] वाताकर्षच्या उत्तर सीमेला वासुकी (Hydra) आहे, तर पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेला अनुक्रमे होकायंत्र (Pyxis), नौशीर्ष (Vela) आणि नरतुरंग (Centauri) तारकासमूह आहेत. या तारकासमूहासाठी इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने Ant हे तीन अक्षरी संक्षिप्त रूप स्वीकृत केले आहे.[५] याच्या सीमांचे निर्देशक विषुवांश ०९ता २६.५मि ते ११ता ०५.६मि दरम्यान आणि क्रांती -२४.५४° आणि -४०.४२° या दरम्यान आहे.[२]
वैशिष्ट्ये
[संपादन]तारे
[संपादन]या तारकासमूहामध्ये ६.५ दृश्यप्रतीचे किंवा त्यापेक्षा तेजस्वी असे ४२ तारे आहेत.[४]
पृथ्वीपासून ३७०±२० प्रकाशवर्षे अंतरावरील अल्फा अँटले तारा हा नारंगी राक्षसी तारा आहे.[६] तो एक चल तारा असण्याची शक्यता असून त्याची दृश्यप्रत ४.२२ ते ४.२९ या दरम्यान बदलते.[७] सूर्याच्या ४८० ते ५५५ पट तेजस्विता असणाऱ्या या ताऱ्याने त्याच्या केंद्रातील सर्व इंधन कार्बनमध्ये बदलले असून तो अधिक तेजस्वी होत आहे.[८] पृथ्वीपासून ७१०±४० प्रकाशवर्षे[६] अंतरावरील एप्सिलॉन अँटले हा तारा तुलनेने विकसित असा नारंगी रंगाचा राक्षसी तारा आहे. फुगल्यामुळे त्याचा व्यास सूर्याच्या ६९ पट[९] आणि तेजस्विता १२७९ पट[१०] झाली आहे.
डेल्टा अँटले हा पृथ्वीपासून ४३०±३० प्रकाशवर्षे अंतरावरील द्वैती तारा आहे.[६] प्रमुख तारा ५.६ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे, तर दुय्यम तारा ९.६ दृश्यप्रतीचा पिवळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे.[११] झीटा अँटले हादेखील द्वैती तारा आहे. त्यातील प्रमुख तारा झीटा १ अँटले हा पृथ्वीपासून ४१०±४० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याची दृश्यप्रत ५.७४ आहे.[६] दुसरा तारा झीटा२ अँटले पृथ्वीपासून ३८०±२० प्रकाशवर्ष अंतरावर असून[६] त्याची दृश्यप्रत ५.९ आहे.[१२] ईटा अँटले हा आणखी एक द्वैती तारा आहे. याच्या मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत ५.३१ असून दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ११.३ आहे.[१३] थीटा अँटले आणखी एक द्वैती तारा आहे.[१४] एस अँटले ही द्वैती ताऱ्याची प्रणाली आहे ज्याची दृश्यप्रत ६.२७ पासून ६.८३ पर्यंत दर १५.६ तासांनी बदलते.[१५] मुख्य तारा दुय्यम ताऱ्यापेक्षा उष्ण असून दुसरा तारा मुख्य ताऱ्याच्या समोरून गेल्यामुळे प्रणालीची दृश्यप्रत घटते. त्यांच्या कक्षेच्या आवृत्तिकालावरून काढलेले त्यांचे गुणधर्म असे दर्शवतात की मुख्य ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या १.९४ पट आणि व्यास २.०२६ पट आहे आणि दुय्यम ताऱ्याचे वस्तूमान सूर्याच्या ०.७६ पट आणि व्यास १.३२२ पट आहे.[१६] ही प्रणाली ५-६ अब्ज वर्ष जुनी आहे असा अंदाज आहे. हे दोन तारे कालांतराने विलीन होऊन एक वेगाने फिरणारा तारा तयार होईल.[१६]
वाताकर्षमध्ये टी अँटले, यू अँटले, बीएफ अँटले, एजी अँटले युएक्स अँटले असे इतर विविध प्रकारचे चल तारे आहेत.
एचडी ९३०८३ हा सूर्यापेक्षा लहान आणि थंड नारंगी बटू तारा आहे. त्याच्याभोवती एक ग्रह आहे ज्याचा २००५ मध्ये शोध लागला. जवळजवळ शनी ग्रहाएवढ्या वजनाचा हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती १४३ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि त्याचे ताऱ्यापासूनचे सरासरी अंतर ०.४७७ AU आहे.[१७] वास्प-६६ हा सूर्यासारखा तारा आहे. २०१२ साली त्याच्याभोवती गुरू ग्रहाच्या २.३ पट वजनाचा ग्रह दर ४ दिवसांनी प्रदक्षिणा करत असल्याचा शोध लागला.[१८]
दूर अंतराळातील वस्तू
[संपादन]वाताकर्ष मध्ये अनेक अंधुक दीर्घिका आहेत.[१९] एनजीसी २९९७ ही १०.६ दृश्यप्रतीची दीर्घिका त्यामधील सर्वात तेजस्वी दीर्घिका आहे.[२०] ती एक Sc प्रकारची फेस-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिच्या छायाचित्रांमध्ये अनेक धुळीचे मार्ग आणि तरुण ताऱ्यांचे तेजस्वी गुच्छ दिसतात.[१२] १९९७ साली जिचा शोध लागला अशी वाताकर्ष बटू दीर्घिका १४.८ दृश्यप्रतीची असून ती दीर्घिकांच्या स्थानिक गटाची सदस्य आहे.[२१]
वाताकर्ष गुच्छ ज्याला अबेल एस०६३६ असेही संबोधले जाते, वासुकी-नरतुरंग महागुच्छातील दीर्घिकांचा एक लहान गुच्छ आहे. हा कन्या गुच्छ आणि अश्मंत (Fornax) गुच्छ यांखालोखाल स्थानिक समूहापासून तिसरा सर्वात जवळचा दीर्घिकांचा गुच्छ आहे.[२२] गुच्छाचे पृथ्वीपासूनचे अंतर ४०.५ मेगापार्सेक (१३२.१ दशलक्ष प्रकाशवर्षे) ते ४०.९ मेगापार्सेक (१३३.४ दशलक्ष प्रकाशवर्षे) एवढे आहे. तारकासमूहाच्या आग्नेय कोपऱ्यातील या गुच्छामध्ये जवळपास २३४ दीर्घिका आहेत. त्यांमधील एनजीसी ३२६८ आणि एनजीसी ३२५८ या भव्य लंबवर्तुळाकार दीर्घिका त्याच्या दक्षिण आणि उत्तर उपगटांच्या मुख्य सदस्य आहेत.[१९]
पहा
[संपादन]ताऱ्यांच्या मराठी नावांसाठी पहा : [१][permanent dead link] किंवा [२]
संदर्भ
[संपादन]- ^ Bakich Michael E. The Cambridge Guide to the Constellations. Cambridge, United Kingdom.
- ^ a b c "Antlia, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 14 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "The 100 Nearest Star Systems". 2 May 2016 रोजी पाहिले.
- ^ a b c Ridpath, Ian. "Constellations: Andromeda–Indus". Star Tales. self-published. 26 August 2015 रोजी पाहिले.
- ^ Russell, Henry Norris (1922). "The New International Symbols for the Constellations". Popular Astronomy. 30: 469. Bibcode:1922PA.....30..469R.
- ^ a b c d e van Leeuwen, F. (2007). "Validation of the new Hipparcos reduction". Astronomy and Astrophysics. 474 (2): 653–64. arXiv:0708.1752. Bibcode:2007A&A...474..653V. doi:10.1051/0004-6361:20078357.
- ^ Watson, Christopher. "Alpha Antliae". AAVSO Website. 25 July 2014 रोजी पाहिले.
- ^ James B. Kaler. "Alpha Antliae". Stars. 25 July 2014 रोजी पाहिले.
- ^ Pasinetti-Fracassini, L.E.; Pastori, L.; Covino, S.; Pozzi, A. (February 2001). "Catalogue of Stellar Diameters (CADARS)". Astronomy and Astrophysics. 367: 521–24. arXiv:astro-ph/0012289. Bibcode:2001A&A...367..521P. doi:10.1051/0004-6361:20000451.
- ^ McDonald, I.; Zijlstra, A. A.; Boyer, M. L. (2012). "Fundamental Parameters and Infrared Excesses of Hipparcos Stars". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 427 (1): 343–57. arXiv:1208.2037. Bibcode:2012MNRAS.427..343M. doi:10.1111/j.1365-2966.2012.21873.x.
- ^ Huélamo, N.; Neuhäuser, R.; Stelzer, B.; Supper, R.; Zinnecker, H. (July 2000). "X-ray emission from Lindroos binary systems". Astronomy & Astrophysics. 359: 227–41. arXiv:astro-ph/0005348. Bibcode:2000A&A...359..227H.
- ^ a b Ridpath 2001, pp. 74–76
- ^ Eggleton, P. P.; Tokovinin, A. A. (September 2008). "A catalogue of multiplicity among bright stellar systems". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 389 (2): 869–79. arXiv:0806.2878. Bibcode:2008MNRAS.389..869E. doi:10.1111/j.1365-2966.2008.13596.x.
- ^ Kaler, James B. (12 April 2013). "Theta Antliae". Stars. University of Illinois. 25 March 2016 रोजी पाहिले.
- ^ Watson, Christopher. "S Antliae". AAVSO Website. 22 May 2014 रोजी पाहिले.
- ^ a b Gazeas, K.; Stȩpień, K. (2008). "Angular momentum and mass evolution of contact binaries". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 390 (4): 1577–86. arXiv:0803.0212. Bibcode:2008MNRAS.390.1577G. doi:10.1111/j.1365-2966.2008.13844.x.
- ^ Lovis, C.; Mayor, M.; Bouchy, F.; Pepe, F.; Queloz, D.; Santos, N.C.; Udry, S.; Benz, W.; Bertaux, J.-L.; Mordasini, C.; Sivan, J.-P. (2005). "The HARPS search for southern extra-solar planets III. Three Saturn-mass planets around HD 93083, HD 101930 and HD 102117". Astronomy and Astrophysics. 437 (3): 1121–26. arXiv:astro-ph/0503660. Bibcode:2005A&A...437.1121L. doi:10.1051/0004-6361:20052864.
- ^ Hellier, Coel; Anderson, D. R.; Collier Cameron, A.; Doyle, A. P.; Fumel, A.; Gillon, M.; Jehin, E.; Lendl, M.; Maxted, P. F. L.; Pepe, F.; Pollacco, D.; Queloz, D.; Ségransan, D.; Smalley, B.; Smith, A. M. S.; Southworth, J.; Triaud, A. H. M. J.; Udry, S.; West, R. G. (2012). "Seven transiting hot Jupiters from WASP-South, Euler and TRAPPIST: WASP-47b, WASP-55b, WASP-61b, WASP-62b, WASP-63b, WASP-66b and WASP-67b". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 426 (1): 439–50. arXiv:1204.5095. Bibcode:2012MNRAS.426..739H. doi:10.1111/j.1365-2966.2012.21780.x.
- ^ a b Streicher, Magda (2010). "Deepsky Delights: Antlia, the Machine Pneumatique". Monthly Notes of the Astronomical Society of Southern Africa. 69 (5–6): 107–12. Bibcode:2010MNSSA..69..107S.
- ^ Moore & Tirion 1997
- ^ Nemiroff Robert. "Antlia: A New Galactic Neighbor". 9 April 2012 रोजी पाहिले.
- ^ Smith Castelli, Analía V.; Bassino, Lilia P.; Richtler, Tom; Cellone, Sergio A.; Aruta, Cristian; Infante, Leopoldo (June 2008). "Galaxy populations in the Antlia cluster – I. Photometric properties of early-type galaxies". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 386 (4): 2311–22. arXiv:0803.1630. Bibcode:2008MNRAS.386.2311S. doi:10.1111/j.1365-2966.2008.13211.x.