वृक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वृक
तारकासमूह
वृक मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Lup
प्रतीक लांडगा
विषुवांश १५.३
क्रांती -४५
चतुर्थांश एसक्यू३
क्षेत्रफळ ३३४ चौ. अंश. (४६वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
४१
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा α Lup (Men) (२.३०m)
सर्वात जवळील तारा एलएचएस ३९७
(१९.३५ ly, ५.९३ pc)
मेसिए वस्तू
शेजारील
तारकासमूह
अंकनी
वृश्चिक
कर्कटक
नरतुरंग
तूळ
वासुकी (corner)
+३५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
जून महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

वृक दक्षिण खगोलातील तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Lupus (ल्यूपस) म्हणतात. हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ लांडगा असा आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.

गुणधर्म[संपादन]

वृकच्या सीमा सहा इतर तारकासमूहांना लागून आहेत. त्यातले पाच तारकासमूह नरतुरंग, वृश्चिक, अंकनी, कर्कटक आणि तूळ हे आहेत तर वासुकी हा त्याला एका कोपऱ्यात स्पर्श करतो. हा तारकासमूह खगोलावरील ३३३.७ चौरस अंशाचा (०.८०९%) भाग व्यापतो. हा ८८ तारकासमूहांमध्ये आकाराच्या क्रमवारीमध्ये ४६वा आहे. वृक हा तारकासमूह १२ भुजांचा बहुभुज आहे. याच्या सीमा विषुवांश १४ता १७मि ४८.०६से ते १६ता ०८मि ३६.६७से, आणि क्रांति −२९.८३° ते −५५.५८° यादरम्यान आहेत. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने या तारकासमूहासाठी १९२२ मध्ये "Lup" या तीन अक्षरी लघुरूपाचा अवलंब केला.

वैशिष्ट्ये[संपादन]

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे वृक तारकासमूहातील तारे

तारे[संपादन]

वृक तारकासमूहामध्ये ६.५ आभासी दृश्यप्रतीचे किंवा त्यापेक्षा जास्त तेजस्वी १२७ तारे आहेत. अल्फा ल्यूपी हा वृकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. बीटा ल्यूपी हा एक निळा राक्षसी तारा आहे.


अल्फा ल्यूपी हा बी१.५ III स्पेक्ट्रल प्रकारचा निळा राक्षसी तारा आहे. तो पृथ्वीपासून ४६० ± १० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.

दूर अंतराळातील वस्तू[संपादन]

एनजीसी ५८८२ ग्रहीय तेजोमेघ. (श्रेयःएचएसटी/नासा/ईएसए).

वृकच्या उत्तरेस एनजीसी ५८२४ आणि एनजीसी ५९८६ हे गोलाकार तारकागुच्छ आहेत आणि जवळच बी २२८ हा कृष्ण तेजोमेघ आहे. त्याच्या दक्षिण भागात एनजीसी ५८२२ आणि एनजीसी ५७४९ हे खुले तारकागुच्छ आहेत आणि एनजीसी ५९२७ हा गोलाकार तारकागुच्छ आहे. पश्चिम सीमेजवळ दोन सर्पिलाकार दीर्घिका आणि वोल्फ-रायेट ग्रहीय तेजोमेघ आयसी ४४०६ आहे, ज्यामध्ये सर्वात उष्ण ताऱ्यांपैकी काही तारे आहेत. आयसी ४४०६ला रेटिना तेजोमेघ असेही म्हणतात. हा सिलिंडरच्या आकाराचा असून ५,००० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.[१] एनजीसी ५८८२ हा आणखी एक ग्रहीय तेजोमेघ तारकासमूहाच्या मध्यभागामध्ये आहे. ऐतिहासिक अतिनवतारा एसएन १००६ जो ३० एप्रिल ते १ मे, १००६ यादरम्यान आकाशामध्ये पहिल्यांदा दिसला अशी काही ऐतिहासिक वर्णने आहेत, वृक तारकासमूहामध्ये आहे.

ईएसओ २७४-१ ही एक एज-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिला १२ इंच व्यासाच्या दुर्बिणीने पूर्ण अंधाऱ्या आकाशात पाहता येऊ शकते. तिच्यामध्ये लहान लंबवर्तुळाकार केंद्रक आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ {{{शीर्षक}}}. 
  2. ^ Dalrymple 2013, पान. 41.
  • Dalrymple, Les (May 2013). "Exploring the M83 Galaxy Group". Sky & Telescope.
  • Ian Ridpath and Wil Tirion (2007). Stars and Planets Guide, Collins, London. ISBN 978-0-00-725120-9. Princeton University Press, Princeton. ISBN 978-0-691-13556-4.