Jump to content

अरुंधती केश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुंधती केश
तारकासमूह
अरुंधती केश मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Com
प्रतीक बेरनाइसचे केस
विषुवांश ११h ५८m २५.०८८५s
१३h ३६m ०६.९४३३s[१]
क्रांती ३३.३०३४३०३°–
१३.३०४०४८५°[१]
क्षेत्रफळ ३८६ चौ. अंश. (४२वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
४४
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा β Com (४.२६m)
सर्वात जवळील तारा β Com
(२९.७८ ly, ९.१८ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षाव कोमा बेरेनिसिड्स
शेजारील
तारकासमूह
शामशबल
सप्तर्षी
सिंह
कन्या
भूतप
+९०° आणि −७०° या अक्षांशामध्ये दिसतो.
मे महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

अरुंधती केश (इंग्रजी: Coma Berenices; कोमा बेरनाइसेस) उत्तर खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. तो सिंह आणि भूतप यांच्या मध्ये आहे आणि दोन्ही गोलार्धातून दिसतो. याच्या पाश्चात्य नावाचा ग्रीक भाषेतील अर्थ "बेरनाइसचे केस" असा असा आहे. हे नाव ईजिप्तची राणी बेरनाइस दुसरी हिच्या नावावरून दिले गेले आहे. तिने धार्मिक कारणासाठी तिचे केस दान केले होते.

अरुंधती केश ५६ अंश दक्षिण अक्षांशाच्या उत्तरेकडील सर्व भागातून दिसते,[२] आणि २ एप्रिलच्या मध्यरात्री भूमंडलावर येते.[३] आकाराने मोठे नसले तरी याच्यामध्ये एक दीर्घिकांचा महासंघ, दीर्घिकांचे दोन संघ, एक तारकागुच्छ आणि आठ मेसिए वस्तू आहेत

वैशिष्ट्ये[संपादन]

Photo of Coma Berenices' three visible stars, which form a triangle
नुसत्या डोळ्यांनी दिसणारे अरुंधती केशमधील तारे

तारे[संपादन]

सर्वात तेजस्वी तारे[संपादन]

अरुंधती केशमध्ये चौथ्या दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी एकही तारा नाही, तरीही अंधाऱ्या रात्री अमावस्येच्या दिवशी त्याच्यामध्ये सुमारे पन्नास तारे नुसत्या डोळ्यांनी दिसतात.[४] या तारकासमूहातील बीटा कोमे बेरनाइसेस हा ४.२६ दृश्यप्रतीचा तारा सर्वात तेजस्वी तारा आहे. तो पृथ्वीपासून २९ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[५] बीटा कोमे बेरनाइसेस सूर्यापेक्षा थोडासा जास्त तेजस्वी आहे.

अल्फा कोमे बेरनाइसेस हा ४.३ दृश्यप्रतीचा तारा या तारकासमूहातील दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे. तो पृथ्वीपासून ५८ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे

गॅमा कोमे बेरनाइसेस हा ४.४ दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा आहे. तो पृथ्वीपासून १७० प्रकाश-वर्ष अंतरावर आहे आणि कोमा तारकागुच्छातील सर्वात तेजस्वी तारा आहे.[६] अल्फा कोमे बेरनाइसेस आणि बीटा कोमे बेरनाइसेससोबत गॅमा कोमे बेरनाइसेस ४५ अंशाचा समद्विभुज त्रिकोण बनवतो.

चलतारे[संपादन]

अरुंधती केशमध्ये २०० पेक्षा जास्त चलतारे आहेत.[७] एफके कोमे बेरनाइसेस ताऱ्याची दृश्यप्रत ८.१४ पासून ८.३३ पर्यंत दर २.४ दिवसांनी बदलते.[७] एफएस कोमे बेरनाइसेस एक लाल राक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत ६.१ ते ५.३ यादरम्यान दर दोन महिन्यांनी बदलते. एम१०० दीर्घिकेमध्ये सुमारे वीस सेफीड चलतारे आहेत ज्यांचे हबल दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात आले होते.[८]

अतिनवतारे[संपादन]

अरुंधती केशमध्ये अनेक अतिनवताऱ्यांचा शोध लागला आहे. एनजीसी ४७२५ मध्ये चार (SN 1940B, SN 1969H, SN 1987E आणि SN 1999gs),[९] आणि एम९९ (एनजीसी ४२५४) मध्ये आणखी चार: SN 1967H, SN 1972Q, SN 1986I आणि SN 2014L.[९] एम१०० (एनजीसी ४३२१) दीर्घिकेमध्ये पाच: SN 1901B, SN 1914A, SN 1959E, SN 1979C आणि SN 2006X.[९] ५ मे १९४० रोजी शोध लागलेला SN 1940B अतिनवतारा पहिला प्रकार २ अतिनवतारा होता.[१०] ३ मार्च २००५ साली शोध लागलेला SN 2005ap अतिनवतारा सर्वात तेजस्वी अतिनवतारा होता. त्याची निरपेक्ष दृश्यप्रत −२२.७ होती.[११][१२]

परग्रह[संपादन]

अरुंधती केशमध्ये सात परग्रह आहेत.[१३] त्यातल्या एचडी १०८८७४ बी या एका परग्रहाला त्याच्या ताऱ्यापासून पृथ्वीला सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेइतकी ऊर्जा मिळते.[१४]

तारकागुच्छ[संपादन]

गोलाकार तारकागुच्छ[संपादन]

एम५३ (एनजीसी ५०५४) हा ७.७ दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो पृथ्वीपासून ५६,००० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. योहान बोडे आणि चार्ल्स मेसिए यांनी स्वतंत्रपणे अनुक्रमे १७७५ आणि १७७७ साली याचा शोध लावला. त्याच्यापासून १° अंतरावर एनजीसी ५०५३ हा गोलाकार तारकागुच्छ आहे. त्याची एकूण तेजस्विता १६,००० सूर्यांएवढी आहे, जी गोलाकार तारकागुच्छातील सर्वात कमी तेजस्विता आहे.

कोमा तारकागुच्छ[संपादन]

कोमा तारकागुच्छ एक मोठा विखुरलेला खुला तारकागुच्छ आहे. यामध्ये पाच ते दहाव्या दृश्यप्रतीचे सुमारे पन्नास तारे आहेत. या तारकागुच्छाचा व्यास जवळपास पाच अंश आहे. तो पृथ्वीपासून २८८ प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

गॅमा-रे स्फोट[संपादन]

अरुंधती केशमध्ये काही गॅमा-रे स्फोट घडले आहेत जसे, ९ मे २००५ रोजीचा GRB 050509B[१५] आणि ७ जून २००८ रोजीचा GRB 080607.[१६]

उल्का वर्षाव[संपादन]

कोमा बेरेनिसिड्स उल्का वर्षाव १८ जानेवारी दरम्यान सर्वात तीव्र असतो.[७] या उल्कावर्षावातील उल्कांचा दर कमी असूनही (सरासरी दोन उल्का प्रति तास) त्यातील उल्कांचा वेग ६५ किमी/सेकंद इतका असू शकतो.[७]

दीर्घिका[संपादन]

इतर दीर्घिका[संपादन]

एन६४ (एनजीसी ४८२६) या दीर्घिकेला काळा डोळा दीर्घिका असेही म्हणतात. तिच्यातील प्रखर केंद्रकासमोरील काळ्या धुळीच्या मार्गांमुळे ते नाव पडले. ही दीर्घिका पृथ्वीपासून २.४ कोटि प्रकाशवर्ष अंतरावर आहे. अलीकडील अभ्यासाअंतर्गत असे आढळले की तिच्या बाहेरील भागातील आंतरतारकीय वायू आणि आतील भागातील आंतरतारकीय वायू एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे गेल्या १ अब्ज वर्षात तिची दुसऱ्या एखाद्या दीर्घिकेशी टक्कर झाली आहे असे अनुमान खगोलशास्त्रज्ञांनी लावले आहे.[१७]

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b "Coma Berenices, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 27 February 2014 रोजी पाहिले.
 2. ^ Michael E. Bakich. The Cambridge Guide to the Constellations. p. 125.
 3. ^ Robert Thompson, Barbara Thompson. Illustrated Guide to Astronomical Wonders: From Novice to Master Observer. p. 184.
 4. ^ "Волосы Вероники" (Russian भाषेत). 2016-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 5. ^ "Beta Comae Berenices". 19 November 2016 रोजी पाहिले.
 6. ^ Joerg S. Schlimmer (January 1, 2014). "Discovery of Small Companions of Comae and TYC 1989-00307-1 in Constellation Coma Berenices and a Possible New Common Proper Motion Pair in the Constellation Canes Venatici" (PDF). 25 November 2016 रोजी पाहिले.
 7. ^ a b c d Tammy Plotner (24 Dec 2015). "Coma Berenices". 15 Aug 2016 रोजी पाहिले.
 8. ^ "Messier 100". 24 November 2016 रोजी पाहिले.
 9. ^ a b c "List of Supernovae". 6 November 2016 रोजी पाहिले.
 10. ^ Albert G. Petschek. Supernovae. p. 60.
 11. ^ Robert M. Quimby, Greg Aldering, J. Craig Wheeler, Peter Höflich, Carl W. Akerlof, Eli S. Rykoff. "SN 2005ap: A Most Brilliant Explosion". doi:10.1086/522862. 6 November 2016 रोजी पाहिले.
 12. ^ "The supernova that just won't fade away". 25 November 2016 रोजी पाहिले.
 13. ^ "HEC: The Constellations of Exoplanets". 2016-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2016 रोजी पाहिले.
 14. ^ W. Lyra. Naming the extrasolar planets. p. 23.
 15. ^ "NASA's Swift catches 500th gamma-ray burst". ScienceDaily. 11 December 2016 रोजी पाहिले.
 16. ^ Francis Reddy. "Gamma-Ray Burst Offers First Peek at a Young Galaxy's Star Factory". 2016-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 December 2016 रोजी पाहिले.
 17. ^ Jamie Wilkins, Robert Dunn. 300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe. Buffalo, New York.