पीठ (तारकासमूह)
तारकासमूह | |
पीठ मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Ara[१] |
---|---|
प्रतीक | वेदी[१] |
विषुवांश |
१६h ३४m १६.९४९७s –१८h १०m ४१.३४०७s[२] |
क्रांती |
−४५.४८५९७३४°– −६७.६९०५८२३°[२] |
क्षेत्रफळ | २३७ चौ. अंश. (६३वा) |
मुख्य तारे | ८[१] |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | १७ |
ग्रह असणारे तारे | ७ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | २ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ३ |
सर्वात तेजस्वी तारा | β Ara (२.८४m) |
सर्वात जवळील तारा |
ग्लीस ६७४ (१४.८ ly, ४.५४ pc) |
मेसिए वस्तू | ० |
उल्का वर्षाव | नाही |
शेजारील तारकासमूह | |
+२५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. जुलै महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
पीठ (इंग्रजी: Ara; लॅटिन: "The Altar") हा वृश्चिक आणि दक्षिण त्रिकोण यांच्यामधला दक्षिण खगोलातील तारकासमूह आहे. पीठ (ग्रीकः Βωμός) हे दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीतील एक तारकासमूह होते.
गुणधर्म
[संपादन]खगोलाचा २३७.१ चौ.अंश भाग (०.५७५%) व्यापणारे पीठ आकारमानाने ८८ आधुनिक तारकासमूहांमध्ये ६३व्या क्रमांकावर आहे.[३] याच्या उत्तरेला वृश्चिक, पश्चिमेला अंकनी आणि दक्षिण त्रिकोण, दक्षिणेला कपोत आणि उत्तरेला मयूर आणि दुर्बीण तारकासमूह आहेत. विषुववृत्तीय निर्देशांक प्रणालीमध्ये पीठची सीमा विषुवांश १६ता ३६.१मि ते १८ता १०.४मि आणि क्रांती −४५.४९° ते −६७.६९° मध्ये आहे.[२]
वैशिष्ट्ये
[संपादन]तारे
[संपादन]पीठमध्ये ६.५ आभासी दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी ७१ तारे आहेत.[३]
बीटा अरी हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.[४] हा नारंगी रंगाचा महाराक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत २.८ आहे आणि पृथ्वीपासूनचे अंतर ६५० प्रकाश-वर्षे आहे.[५]
अल्फा अरी हा निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून २७० प्रकाशवर्षे अंतरावरील या ताऱ्याची दृश्यप्रत २.८ आहे.[५] या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या ९.६ पट आहे[६] आणि सरासरी त्रिज्या ४.५ पट आहे.[७] तसेच तो सूर्याच्या ५८०० पट तेजस्वी आहे[६] आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८,०४४ केल्व्हिन आहे.[७] बीई तारा, अल्फा अरी भोवती विषुववृत्ताच्या प्रतलामध्ये केप्लरीय कक्षेमध्ये घन चकतीमध्ये काही पदार्थ परिभ्रमण करत आहेत. हा तारा ध्रुवीय वादळामधून वस्तुमान गमावत आहे ज्याचा अंतिम वेग १००० किमी/से आहे.[६][८]
३.१३ दृश्यप्रतीचा झीटा अरी पृथ्वीपासून ४९० प्रकाश-वर्षे अंतरावरील नारंगी राक्षसी तारा आहे.[५]
बीटा अरी जवळ गॅमा अरी तारा आहे. हा निळा महाराक्षसी तारा आहे. हा पृथ्वीपासून १११० प्रकाश-वर्षे दूर आहे आणि त्याची दृश्यप्रत ३.३ आहे.[५]
डेल्टा अरी पृथ्वीपासून १९८ प्रकाशवर्षे अंतरावरील ३.६ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.[५]
या तारकासमूहातील सात ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत. म्यू अरी हा तारा खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती चार परग्रह परिभ्रमण करताना आढळले आहेत. त्यातील तीन गुरू ग्रहासारखे वायू-राक्षस आहेत आणि चौथा ग्रह पृथ्वी किंवा मंगळासारखा खडकाळ असण्याची शक्यता आहे. एचडी १५२०८९ या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती एक परग्रह आहे.
दूर अंतराळातील वस्तू
[संपादन]पीठच्या वायव्य टोकावरून आकाशगंगेचे प्रतल जाते. त्यामुळे त्यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ (एदा. एनजीसी ६२००) आणि तेजोमेघ आहेत. सर्वात तेजस्वी गोलाकार तारकागुच्छांपैकी एक सहाव्या दृश्यप्रतीचे एनजीसी ६३९७, पृथ्वीपासून फक्त ६,५०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे, ज्यामुळे ते सूर्यमालेपासून सर्वात जवळील तारगुच्छांपैकी एक आहे.[20]
पीठमध्ये वेस्टरलुंड १, हा महातारकागुच्छ आहे ज्यामध्ये वेस्टरलुंड १-२६ हा लाल महाराक्षसी तारा आहे जो ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या ताऱ्यांपैकी एक आहे.
खुले तारकागुच्छ
[संपादन]- एनजीसी ६१९३ हा एक खुला तारकागुच्छ आहे. याच्यामध्ये ३० तारे आहेत ज्यांची सरासरी दृश्यप्रत ५.० आहे. त्याचा आकार ०.२५ चौ.अंश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या अर्धा आहे. तो पृथ्वीपासून ४२०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.
- एनजीसी ६२००
- एनजीसी ६२०४
- एनजीसी ६२०८
- एनजीसी ६२५०
- एनजीसी ६२५३
- आयसी ४६५१
गोलाकार तारकागुच्छ
[संपादन]- एनजीसी ६३५२
- एनजीसी ६३६२
- एनजीसी ६३९७ हा ६.० दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १०,५०० प्रकाश-वर्षे आहे.[1]
ग्रहीय तेजोमेघ
[संपादन]- स्टिंगरे तेजोमेघ (एचईएन ३-१३५७) हा एक तरुण ग्रहीय तेजोमेघ पीठमध्ये आहे. त्याच्या निर्मितीचा पहिला प्रकाश १९८७ मध्ये पाहण्यात आला.
- एनजीसी ६३२६ एक ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याच्या केंद्रस्थानी द्वैती ताऱ्यांची प्रणाली असण्याची शक्यता वर्तवली जाते.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Ridpath & Tirion 2001, पाने. 82–83.
- ^ a b c "Ara, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 14 February 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "boundary" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b Ridpath, Ian.
- ^ Thompson, Mark (2013).
- ^ a b c d e van Leeuwen, F. (November 2007).
- ^ a b c Meilland, A.; et al.
- ^ a b Meilland, A.; Stee, Ph.; Chesneau, O.; Jones, C. (2009).
- ^ Chesneau, O.; Meilland, A.; Rivinius, T.; Stee, Ph.; Jankov, S.; Domiciano de Souza, A.; Graser, U.; Herbst, T.; Janot-Pacheco, E.; Koehler, R.; Leinert, C.; Morel, S.; Paresce, F.; Richichi, A.; Robbe-Dubois, S. (2005).