Jump to content

रोमन सायप्रस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमन साम्राज्यातील सायप्रसचा प्रांत

सायप्रसचा प्रांत (लॅटिन: Provincia Cyprus, ग्रीक: Ἐπαρχία Κύπρος) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स.पू. ५८ मध्ये सायप्रसचे बेट प्टॉलेमिक साम्राज्याकडून जिंकून घेतल्यावर ते रोमनांसाठी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र झाले. सायप्रसवरील रोमन वर्चस्व चौथ्या शतकापर्यंत अबाधित राहिले व त्यानंतर ते बायझेंटाईन साम्राज्याचा भाग बनले.