डेशिया (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इ.स. १२५ च्या वेळचा डेशिया प्रांत

डेशिया (लॅटिन: Dacia, ग्रीक: Δακία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. हा प्रांत डेशिया ट्राजाना (लॅटिन: Dacia Traiana, ट्राजानचा डेशिया) किंवा डेशिया फेलिक्स (लॅटिन: Dacia Felix, आनंदी डेशिया) या नावांनीही ओळखला जात असे. आजचे ट्रान्सिल्व्हेनियारोमानियाचे बानत व ओल्टेना हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स. १०७ मध्ये सम्राट ट्राजान याने हा प्रदेश जिंकून घेतल्यावर पुढील दीडशे वर्षे या प्रांतावर रोमन आधिपत्य होते. परंतु सततच्या परकीय आक्रमणांमुळे डेशियावरील वर्चस्व कायम ठेवणे रोमनांना अधिकाधिक खर्चिक होत गेले. शेवटी सम्राट ऑरेलियन याने २७१ साली या प्रांतातून पूर्णपणे माघार घेतली.