बिथिनिया व पाँटस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इ.स. १२५ च्या वेळचा बिथिनिया व पाँटस प्रांत

बिथिनिया व पाँटस (लॅटिन: Provincia Bithynia et Pontus, ग्रीक: Επαρχία Βιθυνίας και Πόντου) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. अनातोलिया (आजचा तुर्कस्तान) या प्रदेशाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या भागावर हा प्रांत होता. इ.स.पू. ७४ व इ.स.पू. ६३ या वर्षांमध्ये जिंकून घेतलेल्या बिथिनिया व पाँटस या राजतंत्रांच्या एकत्रीकरणातून हा प्रांत निर्माण झाला होता.