Jump to content

कॅपाडोशा (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. १२५ च्या वेळचा कॅपाडोशा प्रांत

कॅपाडोशा (लॅटिन: Cappadocia, ग्रीक: Καππαδοκία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. याचे स्थान अनातोलिया (आजचा मध्यपूर्व तुर्कस्तान) मध्ये होते. सम्राट टायबेरियस (कारकीर्द इ.स. १४-३७) याने इ.स. १७ मध्ये हा प्रांत स्थापन केला. पुढे पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात पॉंटस व आर्मेनिया हे प्रांतही कॅपाडोशामध्ये विलीन झाले.