यहोवा
यहोवा प्राचीन इस्राएल आणि यहूदाचा राष्ट्रीय देव होता.יהוה ही लिपीत ज्यूधर्मात आणि हिब्रू भाषेत एक देवाचे नाव आहे.
यहोवा हे बायबल मधील जुन्या करारात वापरलेले देवाचे एक प्राचीन नाव आहे. हिब्रू भाषेतील याव्हे या शब्दाचे यहोवा हे इंग्रजी व मराठी रूप सिद्ध झाले आहे. "तुझा देव परमेश्वर (यहोवा - याव्हे) याचे नाव व्यर्थ घेऊ नको कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही." (निर्गम २०:७) या आज्ञेमुळे आपल्याकडून देवाच्या नावाचा व्यर्थ उच्चार होऊ नये म्हणून यहुदी लोकांनी ख्रिस्त पूर्व ३०० मध्ये हे नाव उच्चारणे बंद केले. पवित्र शास्त्राच्या (बायबल) वचंनांमध्ये जेथे हे देवाचे नाव येई तेथे ते त्याचा उच्चार अदोनाय म्हणजे प्रभू असा करीत. सनातन परमेश्वर असा या नावाचा सर्वसाधारण अर्थ होतो.
संदर्भ : पवित्र शास्त्र शब्दकोश
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |