Jump to content

युन्नान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युन्नान
云南省
चीनचा प्रांत

युन्नानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
युन्नानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी कुन्मिंग
क्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,७२,०९,२७७
घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-YN
संकेतस्थळ http://www.yn.gov.cn/

युन्नान (देवनागरी लेखनभेद : युइन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओसव्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे. २०२० साली युन्नान प्रांताची लोकसंख्या ४.७२ कोटी इतकी होती. हान चीनी वंशाच्या लोकांसोबत येथे इतर अनेक अल्पसंख्य गटांचे लोक अनेक शतकांपासून निवास करत आहेत.

युन्नान हा चीनमधील सर्वात अविकसित प्रांतांपैकी एक समजला जातो. येथील भूभाग सर्वसाधारणपणे डोंगराळ स्वरूपाचा आहे. युन्नान प्रांताला चहाचे उगमस्थान मानले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत