बोथे
| ?बोथे महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
१३.३७५२ चौ. किमी • १,०६० मी |
| जवळचे शहर | फलटण |
| जिल्हा | सातारा जिल्हा |
| लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर |
१,१०६ (२०११) • ८३/किमी२ ०.९५ ♂/♀ |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोली भाषा | मराठी |
| कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१५५०३ • एमएच/११ |
बोथे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. सातारा जिल्ह्यातील पहिली सहकारी सोसायटी बोथे गावात सुरू झाली होती. २०११ च्या जनगणनेनुसार [१]या गावाचा सेन्सस कोड ५६३३६८ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या ११०६ आहे. गावात २५७ कुटुंबे राहतात.
प्राथमिक माहिती
[संपादन]समुद्र सपाटीपासून उंची: 1060 मीटर / 1.060 किलोमीटर
क्षेत्रफळ: 1337.52 हेक्टर./ 13.3752 चौरस किलोमीटर
लोकसंख्या: 1106.
कुटुंबे: 257.
पुरुष: 540.
महिला: 566.
भौगोलिक स्थान
[संपादन]बोथे गाव महादेेव डोंगररांगेेतील डोंगरावर वसले आहे. या डोंगराची उंची समुद्रसपाटीपासुुन १०६०मी एवढी आहे. तसेेेच बोथे महादेेव डोंगररांगेतील सर्वांत उंच डोंगर आहे.
हवामान
[संपादन]येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३५ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २५ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण मध्यम असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.तसेच एप्रिल ते मे दरम्यान वळीवाचा पाऊस पडतो. गाव डोंगरावर असल्याने आणि शहरापासून दूर असल्याने हवा शुद्ध आहे.
यात्रा उत्सव
[संपादन]गावातील महादेवदऱ्यातील श्री नाथांचे मंदिर हे बोथे गावातील नाथ देवाचे मूळ स्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला गावात श्री नाथ साहेबांची यात्रा असते. यात्रेच्या आदल्या रात्री देवाची पालखी या मंदिरापाशी आणली जाते, तेव्हा ती हलकी असते. रात्री उशिरापर्यंत गावकरी इथेच असतात. जेव्हा पालखी जड लागू लागते तेव्हा देव पालखीत बसले असे म्हणतात. त्यानंतर श्रींची पालखी वाजत गाजत गावातील मंदिरात आणली जाते.
मूळ स्थानावरून देव पालखीत बसल्यावर पालखी गावातील नाथांच्या मंदिरात आणली जाते. सकाळी पालखीला गोंडे(मोर्चेल) बांधून सजवून रथात ठेवतात. पूर्वी रथ नव्हता तेव्हा भोई पालखी उचलायचे आणि ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करायचे. पालखी प्रत्येकाच्या दारात थांबायची. अंगणात अंथरलेल्या चादरीवर पालखी ठेवली जायची. ज्यांच्या घरी लहान मुले असत, ते लोक त्या लहान मुलांना चादरीवर झोपवत. पालखी मुलांना स्पर्श न होता त्यांच्यावर ठेवली जात असे. पालखीचे पाय मोठे असत, त्यामुळे पालखी मुलांवर अधांतरी राही. पालखीसमोर सनई, पिपाण्या वाजायच्या. घरातील सर्वांचे देवदर्शन आणि नैवेद्य झाल्यानंतर "नाथ साहेबाच्या नावानं चांगभलं! काळभैरीच्या नावानं चांगभलं!"च्या जयघोषात पालखी उचलली जायची. जाणाऱ्या देवावर लोक गुलाल, खोबरे, भुईमुगाच्या शेंगा यांची उधळण करायचे. आता रथ आला असला तरी यात्रेत लोकांचा उत्साह पहायला मिळतो. ग्रामपंचायतीसमोर रथ थांबल्यावर मुक्तहस्ते गुलालाची उधळण करण्यात येते. रथासमोर शाळकरी मुलांचे लेझीम, ढोलपथक, तसेच प्रौढांचे गजी नृत्य बघायला मिळते. यात्रेची पद्धत जरी बदलली असली तरी गुलाल खोबऱ्याची उधळण, लोकांचा उत्साह आणि नाथांची कृपा आजही कायम आहे.
वारकरी आणि माळकरी यांचे गाव म्हणून प्रसिद्ध.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावात श्री नाथांचे मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, निसर्गरम्य महादेवदरा, कुरण नावाच्या शिवारातील तलाव, अनेक पवनचक्क्या ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. तसेच गावातून सूर्योदय व सूर्यास्ताचे विहंगमय दृश्य दिसते. तसेच गावातून नेर तलाव आणि आंधळी धरण ही खटाव आणि माण तालुक्यातील महत्त्वाची दोन्ही धरणे दिसतात.
नागरी सुविधा
[संपादन]शुद्ध पिण्याचे पाणी- गावात आरो वॉटर प्युरीफायर एटीएम आहे.
वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रीट रस्ते आहेत.
एसटी आहे.
वि.का.स. सोसायटी आहे.
बचत गट आहे.
वर्तमानपत्र आहे.
जवळपासची गावे
[संपादन]कुळकजाई, खोकडे, रणशिंगवाडी, बुध, मलवडी, शिरवली, राजापूर, जरांबी, सिताबाईचा डोंगर.
लोकसंख्या
[संपादन]- एकूण लोकसंख्या:११०६; पुरुष: ५४०; स्त्रिया: ५६६
- अनुसूचित जाती लोकसंख्या: ५७; पुरुष: २४; स्त्रिया: ३३
- अनुसूचित जमाती लोकसंख्या:०; पुरुष: ०; स्त्रिया: ०
शैक्षणिक सुविधा
[संपादन]गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. तसेच रयत शिक्षण संस्थेचे 'न्यु इंग्लिश स्कुल बोथे'ही माध्यमिक शाळा आहे.
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही
५ ते १० किमी अंतरावर : काही नाही
१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा माळवाडी येथे आहे. पदवी महाविद्यालय दहिवडी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा सातारा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र सातारा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा दहिवडी येथे आहे.
वैद्यकीय सुविधा
[संपादन]सरकारी
[संपादन]असलेल्या सुविधा- काही नाही
नसलेल्या सुविधा -
कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र क्षयरोग रुग्णालय अॅलोपॅथिक रुग्णालय अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय दवाखाने गुरांचे दवाखाने फिरते दवाखाने कुटुंब कल्याण केन्द्र
बिगर-सरकारी
[संपादन]असलेल्या सुविधा-
बाह्य रोगी विभाग -१, इतर पदवीधर डॉक्टर -१,
नसलेल्या सुविधा -
बाह्य व भरती असलेले रोगी विभाग धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय एमबीबीएस पदवीधर डॉक्टर पदवी नसलेले डॉक्टर पारंपरिक वैद्य व वैदू औषधाची दुकाने इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा
पिण्याचे पाणी
[संपादन]असलेल्या सुविधा-
शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा,
नसलेल्या सुविधा -
शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
स्वच्छता
[संपादन]असलेल्या सुविधा-
सांडपाणी पाण्याच्या स्त्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
नसलेल्या सुविधा -
न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
संचार
[संपादन]गावात असणाऱ्या सुविधा -
मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर.
तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
बाजार व पतव्यवस्था
[संपादन]गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान,
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर.
आरोग्य, आहार व करमणूक सुविधा
[संपादन]गावात असणाऱ्या सुविधा -
शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
समुदाय भवन (दूरचित्रवाणीसह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
वीज पुरवठा
[संपादन]घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
जमिनीचा वापर (हेक्टर)
[संपादन]- जंगल क्षेत्र : ०.०
- बिगरशेतकी वापरातली जमीन: ३.६१
- ओसाड व शेतीला अयोग्य जमीन: ४०५.५५
- कुरणे व इतर चराऊ जमीन: ०.०
- फुटकळ झाडीखालची जमीन: ७.०
- शेतीयोग्य पडीक जमीन: ८०.०
- कायमस्वरूपी पडीक जमीन: २५०.०
- ह्या वर्षीची पडीक जमीन: २२६.०
- पिकांखालची जमीन: ३६५.३६
- एकूण कोरडवाहू शेतजमीन: १२५.०
- एकूण बागायती जमीन: २४०.३६
सिंचन सुविधा (क्षेत्रफळ हेक्टर मध्ये)
[संपादन]- कालवे : ०
- विहिरी / कूप नलिका: १२५
- तलाव / तळी: ०
- ओढे: ०
- इतर : ०
- ^ https: // censusindia.gov. in / census.website / data / census - tables #
- ^ https://villageinfo.in/
- ^ https://www.census2011.co.in/
- ^ http://tourism.gov.in/
- ^ https://www.incredibleindia.org/
- ^ https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- ^ https://www.mapsofindia.com/
- ^ https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- ^ https://www.weather-atlas.com/en/india-climate