विरामचिन्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाक्यांमधून व्यक्त करायचे विचार आणि भावना यथार्थतेने व्यक्त करण्याकरता विरामचिन्हांचा वापर केला जातो.

विरामचिन्हे[संपादन]

  • पूर्णविराम ( . )
  • स्वल्पविराम ( , )
  • अर्धविराम ( ; )
  • उद्गारचिन्ह ( ! )
  • प्रश्नचिन्ह ( ? )

विरामचिन्हांचा वापर[संपादन]

  • थांबा - मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता पूर्णविराम (.), स्वल्पविराम (,), आणि अर्धविराम (;) ही तीन चिन्हे लेखक वापरतात.
  • आश्चर्य - वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्यभाव व्यक्त करण्यासाठी उद्गारचिन्ह (!) वापरतात.
  • प्रश्न - वाक्याला प्रश्नार्थक स्वरूप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा (?) वापर करतात.

विरामचिन्हांची उपयुक्तता दाखवणारी उदाहरणे[संपादन]

मराठी[संपादन]

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.


एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

हिंदी[संपादन]

रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!

इंग्रजी[संपादन]

एकदा एका (शालेय) वर्गात, इंग्रजी व्याकरणाच्या तासाला, एका वाक्यात विरामचिन्हांचा योग्य उपयोग करण्याबाबतच्या एका प्रश्नाला मुलांकडून आणि मुलींकडून वेगळी उत्तरे आली. ती अशी: मुलांचे उत्तर: 'वूमन विदाउट हर मॅन, इझ अ बीस्ट.’ (Woman, without her man, is a beast). याउलट. मुलींचे उत्तर: 'वूमन! विदाउट हर, मॅन इझ अ बीस्ट.' (Woman! without her, man is a beast).