भाषाशास्त्राचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भाषाविषयक नियमांची निश्चित व पद्धतशीर मांडणी आणि अभ्यास संस्कृत भाषेच्या संदर्भात अगदी प्राचीन काळापासून दिसून येतो. संस्कृत भाषेतील भाषेच्या नियमांची त्याच्या व्याकरणाची चर्चा प्राचीन संस्कृत ग्रंथातून दिसते. मराठी भाषेत भाषा-विचाराचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिसून येतो. पाश्चात्त्य जगतात मानववंशशास्त्रज्ञांच्या प्रेरणेतून भाषा विज्ञानाचा अभ्यास अमेरिकेत प्रथम सुरू झाला. मानववंश आणि भाषाविज्ञान यांच्या अभ्यासातून मानवी संस्कृतीचे निष्कर्ष काढण्यासाठी भाषाविज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू झाला. समाजाची संस्कृती समजून घ्यायची असेल तर समाजाच्या रुढी परंपरा चालीरिती धर्म धर्मसंस्था याबरोबर भाषा भाषांची लिपी स्वनीम व्यवस्था,भाषेचे स्वरुप, भाषेतील शब्दसंख्या, भाषेची नियमव्यवस्था, हे घटक संस्कृती अभ्यासण्यासाठी जसे उपयोगाचे आहेत तसेच भाषेचे विविध घटकही मानवाचा मनोव्यापार, समाज आणि त्याची संस्कृती अभ्यासण्यासाठी आवश्यक आहे, असे अभ्यासकांच्या लक्षात आल्यामुळे भाषाशास्त्राचा शास्त्रीय दृष्टीन अभ्यास सुरू झाला.