शब्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास शब्द असे म्हणतात.
उदा. तंगप — पतंग

शब्द हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, वाक्यव्याकरण) एक आहे.

एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो.

प्रकार[संपादन]

शब्दांचे प्रकार : सिद्ध, साधित. सिद्ध शब्दांचे चार प्रकार - देशी, तत्सम, तद्भव, परभाषी.

साधित शब्दांचे प्रकार - उपसर्गघटित, प्रत्ययघटित, -कृत(क्रुदंत/धातुसाधित) आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक, संधी, अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, पुनरूक्त शब्द, द्विरूक्त, ध्वन्य (अनुकरणवाचक) शब्द.

उपसर्गांचे व प्रत्ययांचे प्रकार : मराठी, संस्कृत, अरबी, फारसी ,इंग्लिश ,कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती, हिंदी, इतर.

नामांचे प्रकार - कर्तृवाचक, साधनार्थक, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, योग्यार्थक,

अव्यये - युक्तार्थक, क्रियावाचक, भूतकाल वाचक, क्रियेची मजुरी (?),

अपत्यार्थक, संबधार्थक, भावार्थक भाववाचक, स्थानदर्शक, राखण करणारा, असलेला

नाम-सर्वनाम जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात. उदा. मी, तू, हा, जो, कोण. -विशेषणे : जे शब्दां-नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड, कडू, दहा, क्रियापद- जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा. बसतो, आहे, जाईल क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना -क्रियाविशेषण- म्हणतात. -शब्दयोगी- जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी -उभयान्वयी- जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी म्हणतात. केवलप्रयोगी शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे, अबब

लिंग, वचन, विभक्ती, सामान्यरूप,काळ

शब्दांच्या भाषा[संपादन]

 • अभिधा-वाच्यार्थ
 • लक्षणा-लक्ष्यार्थ
 • व्यंजना-व्यंगार्थ

जाती[संपादन]

मराठीत शब्दांच्या आठ जाती आहेत.

 1. नाम (noun)
 2. सर्वनाम (pronoun)
 3. विशेषण (adjective)
 4. क्रियापद (verb)
 5. क्रियाविशेषण (adverb)
 6. उभयान्वयी अव्यय (conjunction)
 7. शब्दयोगी अव्यय (preposition)
 8. केवलप्रयोगी अव्यय (exclamatory word)

छिर मांजरी[संपादन]