व्युत्पत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


शब्द-घटना अभिनय

"तत्सम" शब्द[संपादन]

मराठीमध्यें विशेष करून संस्कृत, देशी,अरबी, फारसी ह्या भाषांचे शब्द आढळतात; आणि हिंदी, गुजराती, तेलुगू, कानडीइंग्लिश या भाषांचे शब्दही बरेच आलेले आहेत.मराठी संस्कृतोत्पन्न असल्यामुळें व संस्कृतांत नवीन शब्द बनविण्याला उपसर्ग,प्रत्यय,धातुसमास यांमुळे फारच मदत होत असल्यामुळें त्यायोगे संस्कृत शब्द बनतात. अशा प्रकारें बनलेले पुष्कळच संस्कृत शब्द मराठींत जसेच्या कांही फरक ने होता टिकून राहिले आहेत; आणि तसे ठेवण्याची मराठीची प्रवृत्तीही अजून जोरात आहे. अशा संस्कृत शब्दांना "तत्सम" शब्द असे म्हणतात. उदा>-देव, माता, पिता, कवि, गुरू, शत्रु, मित्र, इ.

"प्रावीण्य" शब्द[संपादन]

जे शब्द संस्कृत श्ब्दांच्या मूळ रूपात फरक होऊन मराठींत आलेले आहेत, त्यास "तद्भव" शब्द असे म्हणतात उदा.- घर (गृह), हात (हस्त), पाय (पाद), कान (कर्ण), पान (पर्ण), काटा (कंटक), इ.

"देशी" शब्द[संपादन]

मराठींत असे काही शब्द आहेत कीं, ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे काहीच सांगतां येत नाहीं. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले असावे, असे दिसते; अशा शब्दांना "देशी" शब्द असें म्हणतात. उदा.- झाड, धकटा, लेकरू, इ.

[टीप- मराठी, गुजराती, हिंदी, बांगला, इ. देशांत सध्यां चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असें म्हणतात; पण त्या अर्थाने येथे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रांत मूळ राहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठींत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत, ते 'देशी' शब्द, ह्या अर्थानेंच हेमचंद्र वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरतात, तसा येथें वापरला आहे.]

शब्दांची साधनिका[संपादन]

जे शब्द मराठींत-ते तत्सम असोत, तद्भव असोत, देशी असोत,- त्या शब्दांची साधनिका काय,त् यांचे पूर्वस्वरूप व सध्याचे ह्यात फरक कोणत्या प्रकारे व कोणत्या कारणाने झाला, त्यांचे कांही अर्थांतर झाले की काय, ते का झाले, इ. गोष्टींविशयीं आपल्या भाषेसंबधीं स्थूल अभ्यास करणारांसही थोडी-फार माहिती असणे आवश्यक आहे. तिच्या योगाने चिकित्सक बुद्धि वाढते; यापूर्वीचे समाज, त्यांच्या चालीरिति इत्यादिकांवर प्रकाश पडतो; मानवी संस्कृतीचें पाऊल कसकसें पुढें पडत गेले याची कल्पना येते आणि एकंदरींत ह्या गोष्टी पाहत असता काही चमत्कारिक माहिती मिळून मनाला आंनंदही होतो.

येथे प्रथम संस्कृतसाधित शब्द, नंतर मराठी साधित शब्द आणि शेवटी यवनी म्हणजे अरबी व फारसी भाषांतील व हिंदी, गुजराती, कानडी व मराठीच्या सहचर भाषांतील मराठींत आलेले शब्द, यांचा क्रमाने विचार करू.

मराठींत येणारे बरेचसे संस्कृत शब्द जसेच्या तसे येतात, ते शब्द मूळ संस्कृत धातूंना कधी मागे उपसर्ग कधी पुढें प्रत्यय लावून बनतात तर कधी दोन्ही लागून बनतात.

जीं अव्ययरूप अक्षरें धातूच्या मागे लागून, बरेच वेळा त्या धातूचा अर्थ फिरवतात, त्यांस उपसर्ग असे म्हणतात. उदा.-'ह' धातूचा मूळ अर्थ हरण करणें; परंतु आ-हार=खाणें,वि-हार=खेळणें,सं-हार=ठार मारणें,प्र-हार=तडाखा देणें, याप्रमाणें मागे लागलेल्या अक्षरांमुळें त्या धातूच्या अर्थात बदल झाला आहे. असेंच इतर धातूंविषयीं समजावें. उपसर्ग हे स्वतंत्रपणें केव्हांच येऊ शकत नाहींत. कोणत्या उपसर्गामुळें कोणते अर्थ उत्पन्न होतात याची कल्पना येण्यासाठी ते उपसर्ग व त्यांनी युक्त असे शब्द देतों.

संस्कृत उपसर्ग[संपादन]

  • अति-(आधिक्य)अतिशय, अतिरेक;
  • अति-(पलीकडे) अतिक्रम, अत्यंत
  • अधि-(मुख्य) अधिपति, अध्यक्ष
  • अधि-(वर)अध्ययन, अध्यापन
  • अनु-(मागुन) अनुक्रम, अनुताप, अनुज;
  • अनु-(प्रमाणें) अनुकरण, अनुमोदन.
  • अप-(खालीं येणें) अपकर्ष, अपमान;
  • अप-(विरुद्ध होणें) अपकार, अपजय.
  • अपि-(आवरण) अपिधान=अच्छादन
  • अभि-(अधिक) अभिनंदन, अभिलाप
  • अभि-(जवळ) अभिमुख, अभिनय
  • अभि-(पुढें) अभ्युत्थान, अभ्युदय.
  • अव-(खालीं) अवगणना, अवतरण;
  • अव-(अभाव,विरूद्धता) अवकृपा, अवगुण.
  • आ-(पासून,पर्यंत) आकंठ, आजन्म;
  • आ-(किंचीत) आरक्त;
  • आ-(उलट) आगमन, आदान;
  • आ-(पलीकडे) आक्रमण, आकलन.
  • उत्-(वर) उत्कर्ष,उत्तीर्ण,उद्भिज्ज
  • उप-(जवळ)उपाध्यक्ष,उपदिशा;
  • उप-(गौण) उपग्रह,उपवेद,उपनेत्र
  • दुर्,दुस्-(वाईट) दुराशा,दुरुक्ति,दुश्चिन्ह,दुष्कृत्य.
  • नि-(अत्यंत) निमग्न,निबंध
  • नि-(नकार) निकामी,निजोर.
  • निर्-(अभाव) निरंजन,निराषा
  • निस्(अभाव) निष्फळ,निश्चल,निःशेष.
  • परा-(उलट) पराजय,पराभव
  • परि-(पूर्ण) परिपाक,परिपूर्ण(व्याप्त),परिमित,परिश्रम,परिवार
  • प्र-(आधिक्य) प्रकोप,प्रबल,प्रपिता
  • प्रति-(उलट) प्रतिकूल,प्रतिच्छाया,
  • प्रति-(एकेक) प्रतिदिन,प्रतिवर्ष,प्रत्येक
  • वि-(विशेष) विख्यात,विनंती,विवाद
  • वि-(अभाव) विफल,विधवा,विसंगति
  • सम्-(चांगले)संस्कृत,संस्कार,संगीत,
  • सम्-(बरोबर)संयम,संयोग,संकीर्ण.
  • सु-(चांगले) सुभाषित,सुकृत,सुग्रास;
  • सु-(सोपें) सुगम,सुकर,स्वल्प;
  • सु-(अधिक) सुबोधित,सुशिक्षित.
  • एकाच शब्दात दोन किंवा अधिक उपसर्ग

उदा.-

  • प्रति+अप+वाद=प्रत्यपवाद
  • सम्+आ+लोचन=समालोचन
  • वि+आ+करण=व्याकरण,अत्युत्कृष्ट,निर्विकार,सुसंगति इ.

उर्दू उपसर्ग[संपादन]

उपसर्ग - अर्थ - शब्दरूप अल - निश्र्चित, अन्तिम - अलविदा, अलबत्ता कम - हीन, थोड़ा, अल्प - कमसिन, कमअक्ल, कमज़ोर खुश - श्रेष्ठता के अर्थ में - खुशबू, खुशनसीब, खुशकिस्मत, खुशदिल, खुशहाल, खुशमिजाज ग़ैर - निषेध - ग़ैरहाज़िर ग़ैरकानूनी ग़ैरवाजिब ग़ैरमुमकिन ग़ैरसरकारी ग़ैरमुनासिब दर - मध्य में - दरम्यान दरअसल दरहकीकत ना - अभाव - नामुमकिन नामुराद नाकामयाब नापसन्द नासमझ नालायक नाचीज़ नापाक नाकाम फ़ी - प्रति - फ़ीसदी फ़ीआदमी ब - से, के, में, अनुसार - बनाम बदस्तूर बमुश्किल बतकल्लुफ़ बद - बुरा - बदनाम बदमाश बदकिस्मत बदबू बदहज़मी बददिमाग बदमज़ा बदहवास बददुआ बदनीयत बदकार बर - पर, ऊपर, बाहर - बरकरार बरवक्त बरअक्स बरजमां कंठस्थ बा - सहित - बाकायदा बाकलम बाइज्जत बाइन्साफ बामुलाहिज़ा बिला - बिना - बिलावज़ह बिलालिहाज़ बिलाशक बिलानागा बे - बिना - बेबुनियाद बेईमान बेवक्त बेरहम बेतरह बेइज्जत बेअक्ल बेकसूर बेमानी बेशक ला - बिना, नहीं - लापता लाजबाब लावारिस लापरवाह लाइलाज लामानी लाइल्म लाज़वाल सर - मुख्य - सरहद सरताज सरकार सरगना

संदर्भ[संपादन]

'मराठी व्याकरण'(प्रथम प्रकाशन १९३५):लेखक कै. मोरेश्वर सखाराम मोने (मृत्यु १९४७)