सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
सहावा जॉर्ज
King George VI LOC matpc.14736 (cleaned).jpg

कार्यकाळ
११ डिसेंबर १९३६ – ६ फेब्रुवारी १९५२
पंतप्रधान
मागील एडवर्ड आठवा
पुढील एलिझाबेथ दुसरी

भारताचा सम्राट
कार्यकाळ
११ डिसेंबर १९३६ – १५ ऑगस्ट १९४७
मागील आठवा एडवर्ड

जन्म १४ डिसेंबर १८९५ (1895-12-14)
नॉरफोक, इंग्लंड
मृत्यू ६ फेब्रुवारी, १९५२ (वय ५६)
नॉरफोक, इंग्लंड
अपत्ये एलिझाबेथ दुसरी, युवराज्ञी मार्गारेट

सहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले.

आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजऱ्या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.

२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: