बुरशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुरशी

बुरशी अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बुरशीची गणना वनस्पती वा प्राणी या दोन्ही गटांत होत नाही. विज्ञानाच्या सुरुवातीच्या कालखंडात या जीवाची गणना वनस्पतीमध्येच केली जाई, कारण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत नाहीत. परंतु निरीक्षणा नंतर लक्षात आले की, हा जीव नाश पावणार्‍य जीवांवरच जगतो आणि त्यात वनस्पतीं प्रमाणे त्यात हरितद्रव्य नाही. म्हणून बुरशी हा गट वर्गीकरण शास्त्राला पडलेले एक कोडे आहे. बुरशीच्या सुमारे एक लाख जाती ज्ञात आहेत. बुरशीच्या अभ्यासाला मायकोलॉजी असे म्हणतात

आढळ[संपादन]

बुरशीचा आढळ आणि विस्तार जवळजवळ सर्वत्र दिसून येतो. वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश, तसेच खोल समुद्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही बुरशीची वाढ होते.

उपयोग[संपादन]

बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. दारू बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. ब्रेड वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी यीस्ट वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. औषधे बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो. अळंबी प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी चवीला रुचकर असते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास बुरशीची मोठी मदत आहे. अन्नसाखळीचे चक्र बुरशीमुळेच पूर्ण होते.

बाह्यदुवे[संपादन]