पेनिसिलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पेनिसिलिनची संरचना

पेनिसिलिन (संक्षिप्तरुपात PCN अथवा pen) हा β-lactam प्रकारामधील जीवाणूनाशकांचा एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे "ग्रॅम-अनुकूल" जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांवर उपाय म्हणून केला जातो. “पेनिसिलिन” हे नाव अनौपचारीकरित्या पेनिसिलिन-जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या Penam नावाच्या संरचनेसाठीही वापरले जाते. Penam च्या रेणूचे सूत्र R-C9H11N2O4S असे आहे, ज्यात R ही एक उप-शृंखला आहे. पेनिसिलीन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम प्रतिजैविक (antibiotic) आहे.

पेनिसिलिनचा शोध व इतिहास[संपादन]

पेनिसिलिनचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ सर अलेक्झँडर फ्लेमिंग यांनी इ.स. १९२८ मध्ये लावला. पेनिसिलिनचा औषध म्हणून वापर करण्याचे श्रेय ऑस्ट्रेलियन नोबेल पारितोषिक विजेते हॉवर्ड वॉल्टर फ्लॉरे यांच्याकडे जाते.

तथापि, याआधी इतर बऱ्याच लोकांनी, जीवाणूंना निष्क्रीय करण्याच्या पेनिसिलियमच्या परिणामांची नोंद केलेली दिसून येते: इ.स. १८७५ मध्ये याबद्दलचा पहिला संदर्भ प्रसिद्धीस दिला गेल्याचे दिसून येते. याचा अहवाल जॉन टिंडॉल यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीला दिल्याची नोंद आहे.[१]


संदर्भ[संपादन]

  1. Phil. Trans., 1876, 166, pp27-74. Referred to at: Discoveries of anti-bacterial effects of penicillium moulds before Fleming