मशरूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.[ संदर्भ हवा ]

भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

बटन मशरूम[संपादन]

हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट खत तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करतात. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बटन मशरूमचे बी पॆरतात. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर त्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. या उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.

शिंपला मशरूम[संपादन]

शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.

संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड हॊथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.

संदर्भ[संपादन]

[१]