Jump to content

सर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर्दी
इतर नावे सर्दी, पडसे, तीव्र व्हायरल नासोफरीन्जायटिस, नासोफरीन्जायटिस, व्हायरल नासिका, नासिकाशोथ, तीव्र कोरायझा[]
सर्दीचा विषाणू
मानवी सर्दीच्या विषाणूच्या आण्विक पृष्ठभागाची प्रातिनिधिक आकृती
लक्षणे खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक, ताप[] []
गुंतागुंत ओटिटिस मीडिया, सायनुसायटिस[]
सामान्य प्रारंभ ~२ दिवसांच्या संगतीमुळे[]
कालावधी १-३ आठवडे [][]
कारणे विषाणू (व्हायरल) []
विभेदक निदान असोशी नासिकाशोथ, ब्राँकायटिस, पेर्ट्यूसिस, सायनुसायटिस[]
प्रतिबंध हात धुणे, चेहऱ्यावर मुखवटा घालणे[]
उपचार रोगसूचक उपचार,[] झिंक []
औषधोपचार एनएसएआयडी[]
वारंवारता दर वर्षी २-४ वेळा(प्रौढ); दर वर्षी ६-८ वेळा(लहान मुले)[१०]

सामान्य सर्दी, ज्याला फक्त सर्दी म्हणून ओळखले जाते, तो वरच्या श्वसनमार्गाचा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने नाकांवर परिणाम करतो.[] नाकातून पाणी वहाणे यास सर्दी म्हणतात. तिची अनेक कारणे असू शकतात. त्यांपैकी इन्फेक्शन आणि ॲलर्जी अशी दोन प्रमुख आहेत. सर्दीमुळे घसा, सायनस आणि स्वरयंत्रावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. [] विषाणूच्या संपर्काने आल्यानंतर दोन दिवसात सर्दीची चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात. यात खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश असू शकतो. [][] लोक सर्दीतून बहुधा सात ते दहा दिवसांत बरे होतात [] परंतु काही लक्षणे तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. [] कधीकधी त्या इतर लक्षणांमुळे न्यूमोनिया होऊ शकतो. []

जवळपास २००पेक्षा जास्त विषाणूंचे उपप्रकार सामान्य सर्दी होण्यास कारणीभूत असतात, त्यातील रायनोवायरस सामान्यत: आढळतो. [११] हा विषाणू संक्रमित लोकांच्या जवळ गेल्यास हवेतून पसरतो किंवा अप्रत्यक्षपणे वातावरणातील वस्तूंशी संपर्क साधून, त्यानंतर तोंड किंवा नाकावाटे पसरतो. [] सामान्यत: जोखीच्या जागा उदा० लहान मुलांची रुग्णालये, गर्दीची ठिकाणी गेल्यानेही सर्दी होऊ शकते, तसेच चांगली झोप न आल्याने किंवा मानसिक तणावामुळेही सर्दी होऊ शकते. सर्दीचे परिणाम हे मुख्यत्वे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे तयार होतात, विषाणूंनी पेशी नष्ट केल्यामुळे नाही. [१२] याउलट, इन्फ्लूएन्झामुळे झालेली सर्दी साध्या सर्दी सारखेच लक्षण दर्शविते, परंतु ती लक्षणे बहुधा जास्त तीव्र असतात. याव्यतिरिक्त, वाहत्या नाकामुळे इन्फ्लुएन्झा असण्याची शक्यता कमी होते.[१३]

सामान्य सर्दीसाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. सर्दी न होऊ देण्यासाठीचे उपाय म्हणजे हात धुणे, हात न धुता डोळे, नाक किंवा तोंड स्पर्श न करणे आणि आजारी लोकांपासून दूर रहाणे हे आहेत. काही पुराव्यांनुसार फेस मास्क वापरून सर्दीपासून दूर रहाता येते.[१४] सर्दीच्या झाल्यावर उपचार नाही, परंतु लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. लक्षणांची सुरुवात झाल्यानंतर लगेचच जस्त (झिंक)चा वापर केल्यास लक्षणांचा कालावधी आणि तीव्रता कमी करू शकतो.[] इबूप्रोफेन सारख्या नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.[] सर्दीसाठी प्रतिजैविकांचा (ॲंटीबायोटिक्स) वापर करू नये.[१५] आणि खोकल्याच्या औषधांचा फायदा झाल्याचा पुरावा उपल्ब्ध नाही.[][१६]

सामान्य सर्दी हा मानवांमध्ये सर्वात वारंवार होणारा संसर्गजन्य रोग आहे.[१७] सरासरी प्रौढ व्यक्तीला वर्षाला दोन ते तीन वेळेस सर्दी होते, तर लहान मुलांस सहा ते आठ वेळ होण्याची शक्यता असते.[][१०] हिवाळ्यामध्ये या रोगाचे लागण अधिक प्रमाणात होते.[] सर्दी हा रोग मानवी इतिहासात पुरातन काळापासून आढळतो.[१८]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ John, Pramod R. John (2008). Textbook of Oral Medicine. Jaypee Brothers Publishers. p. 336. ISBN 978-81-8061-562-7. 29 मे 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  2. ^ a b c d e f g h i "Common Colds: Protect Yourself and Others". CDC. 6 ऑक्टोबर 2015. 5 फेब्रुवारी 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 फेब्रुवारी 2016 रोजी पाहिले.
  3. ^ a b Eccles R (नोव्हेंबर 2005). "Understanding the symptoms of the common cold and influenza". Lancet Infect Dis. 5 (11): 718–25. doi:10.1016/S1473-3099(05)70270-X. PMID 16253889.
  4. ^ a b Bennett, John E.; Dolin, Raphael; Blaser, Martin J. (2014). Principles and Practice of Infectious Diseases (इंग्रजी भाषेत). Elsevier Health Sciences. p. 750. ISBN 978-1-4557-4801-3. 8 सप्टेंबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  5. ^ a b c Allan, GM; Arroll, B (18 फेब्रुवारी 2014). "Prevention and treatment of the common cold: making sense of the evidence". CMAJ : Canadian Medical Association Journal. 186 (3): 190–99. doi:10.1503/cmaj.121442. PMC 3928210. PMID 24468694.
  6. ^ a b Heikkinen T, Järvinen A (जानेवारी 2003). "The common cold". Lancet. 361 (9351): 51–59. doi:10.1016/S0140-6736(03)12162-9. PMID 12517470.
  7. ^ a b c Arroll, B (मार्च 2011). "Common cold". Clinical Evidence. 2011 (3): 1510. PMC 3275147. PMID 21406124. Common colds are defined as upper respiratory tract infections that affect the predominantly nasal part of the respiratory mucosa साचा:Open access
  8. ^ a b "Zinc – Fact Sheet for Health Professionals". Office of Dietary Supplements, US National Institutes of Health. 11 फेब्रुवारी 2016. 7 जानेवारी 2018 रोजी पाहिले. Although studies examining the effect of zinc treatment on cold symptoms have had somewhat conflicting results, overall zinc appears to be beneficial under certain circumstances.
  9. ^ a b Kim, SY; Chang, YJ; Cho, HM; Hwang, YW; Moon, YS (21 सप्टेंबर 2015). "Non-steroidal anti-inflammatory drugs for the common cold". The Cochrane Database of Systematic Reviews. 9 (9): CD006362. doi:10.1002/14651858.CD006362.pub4. PMID 26387658.
  10. ^ a b Simasek M, Blandino DA (2007). "Treatment of the common cold". American Family Physician. 75 (4): 515–20. PMID 17323712. 26 सप्टेंबर 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. साचा:Open access
  11. ^ "Common Cold and Runny Nose" (17 April 2015). CDC. 1 फेब्रुवारी 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 फेब्रुवारी 2016 रोजी पाहिले.
  12. ^ Eccles p. 112
  13. ^ "Cold Versus Flu". 11 ऑगस्ट 2016. 6 जानेवारी 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 जानेवारी 2017 रोजी पाहिले.
  14. ^ Eccles p. 209
  15. ^ Harris, AM; Hicks, LA; Qaseem, A; High Value Care Task Force of the American College of Physicians and for the Centers for Disease Control and, Prevention (19 जानेवारी 2016). "Appropriate Antibiotic Use for Acute Respiratory Tract Infection in Adults: Advice for High-Value Care From the American College of Physicians and the Centers for Disease Control and Prevention". Annals of Internal Medicine. 164 (6): 425–34. doi:10.7326/M15-1840. PMID 26785402.
  16. ^ Malesker, MA; Callahan-Lyon, P; Ireland, B; Irwin, RS; CHEST Expert Cough, Panel. (नोव्हेंबर 2017). "Pharmacologic and Nonpharmacologic Treatment for Acute Cough Associated With the Common Cold: CHEST Expert Panel Report". Chest. 152 (5): 1021–37. doi:10.1016/j.chest.2017.08.009. PMC 6026258. PMID 28837801.
  17. ^ Eccles p. 1
  18. ^ Eccles, Ronald; Weber, Olaf (2009). Common cold. Basel: Birkhäuser. p. 3. ISBN 978-3-7643-9894-1. 8 मे 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.