पवनी (भंडारा)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
| ?पवनी महाराष्ट्र • भारत | |
| टोपणनाव: विदर्भ काशी | |
| — शहर — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
९ चौ. किमी • २२६ मी |
| जवळचे शहर | भंडारा |
| प्रांत | विदर्भ |
| विभाग | नागपूर |
| जिल्हा | भंडारा |
| लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२२,८२१ (२०११) • २,५३६/किमी२ ९८२ ♂/♀ ८६.०७ % • ९२.०२ % • ८०.०४ % |
| भाषा | मराठी |
| नगराध्यक्ष | पूनम काटखाये |
| आमदार | नरेंद्र भोंडेकर |
| संसदीय मतदारसंघ | भंडारा-गोंदिया |
| विधानसभा मतदारसंघ | भंडारा |
| नगर परिषद | पवनी नगर परिषद |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४१९१० • +९१७१८५ • महा-३६ |
पवनी (राजा "पवन" पासून साधित) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असलेले एक शहर/तालुका ठिकाण आहे. प्राचीन काळात, पवनी हॅंडलूम वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होते.
- भंडारा जिल्हा मुख्यालयापासून ४२ किमी. अंतरावर पवनी तालुक्याचे ठिकाण आहे.
पौनी किंवा पवनी वैनगंगा नदीच्या तटावर दक्षिणगंगा म्हणून ओळखले जाते.
- हे शहर तीन बाजूंनी पर्वताने व चौथ्या बाजूने नदीने घसरलेले आहे.
हे एक तिर्थस्थळ/तीर्थस्थान आहे.
नावाची व्युत्पत्ती
[संपादन]राजा पवन याने अनेक वर्षांपूर्वी या शहरावर राज्य केले होते.
- पवन राजाच्या नावावरुनच या गावाला पवनी असे नाव पडले.
पवनीचे आकर्षण
[संपादन]- मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा, पवन राजाचा किल्ला पर्यटकांना खुणावत आहे.
वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगरमाथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते.
- भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा सांगणारा हा किल्ला आजही अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.
- पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात भरभराटीस आले होते. सम्राट अशोकांचे येथे काही काळ वास्तव्य केले. त्यांची मुलगी संघमित्रा याच ठिकाणावरून श्रीलंकेला धर्म प्रसारासाठी गेल्याचे इतिहास सांगते.
या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स. पूर्व पहिल्या शतकातला शत्रकुमार रूपाअंम्माचा स्तंभलेख येथे उत्खननात आढळला. आज तो नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात या परिसराचे वैभव सांगते.
- १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तु संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली या परिसराचे उत्खनन झाले. यात इ.स. पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याच्या अलंकार, तांब्यांची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या वस्तु आढळल्या.
- डॉ.मिराशे यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेला उत्खननास राजा भगदत्त यांना शिलालेख मिळाला.
गावाचा मुख्य रस्ता या किल्ल्याच्या दरवाज्यातूनच जातो. आजही हा किल्ला सुस्थितीत असून किल्ल्याची भिंत आणि तिचा पायथ्याशी असलेला बालसमुद्र तलाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
याच परिसरात अशोक स्तंभ, अनेक घाट, हाकेच्या अंतरावर रुयाळ येथे महासमाधी महाभूमी बोधीस्तुप
- पवनी-उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय प्रकल्प असलेले इंदिरा गांधी धरण (गोसीखुर्द) आहे.
- सर्वतोभद्र (पवनी)
वैभवशाली इतिहास
[संपादन]- पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकाटक, गोंडराजे, भोसले आणि इंग्रजांनी राज्य केले.
- यादवांचे राज्य इ.स. १३१८ मध्ये लयास गेल्यावर देवगडच्या गवळीराजाने सत्ता प्रस्थापित केली.
- त्यानंतर चांद्याच्या गोंड राज्याने हा प्रदेश जिंकला.
- इ.स.१७३९ मध्ये नागपुरच्या रघुजी भोसल्यांनी पवनीचा प्रदेश वलीशहा या गोंड राज्याचा पराभव करून जिंकला, त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. त्यांचे वंशज तुराणकर आजही आहेत.
- पवनीवर पेंढाऱ्यांनी तिनदा आक्रमण केले. २दा पवनीकरांनी पराभव स्विकारला, मात्र तिसऱ्यांदा एकजुट करून लोकांनी पेंढाऱ्यांना पिटाळून लावले. तर २५ सप्टेंबर १८१८ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून पवनी हस्तगत केली.
