ट्राजान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्राजान
रोमन सम्राट
Trajan-Xanten.JPG

मार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस तथा ट्राजान (सप्टेंबर १८, इ.स. ५३:इटालिका - ऑगस्ट ९, इ.स. ११७) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी दुसरा होता.

याने इ.स. ९८ ते मृत्यु पर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकालात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोप व एशियात झाला. इ.स. १०१मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे जॉर्डनसौदी अरेबियाचा काही भाग जिंकत गेला. ट्राजानच्या कर्तृत्त्वाच्या मध्याह्नी रोमन साम्राज्य ईंग्लंड पासून इराकफ्रांस पासून लिब्याईजिप्त पर्यंत पसरलेले होते.

इ.स. ११७मध्ये लढाईत असताना तो जलोदराने मृत्यु पावला.