Jump to content

कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कनेटिकट
Connecticut
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द कॉन्स्टिट्युशन स्टेट (The Constitution State)
ब्रीदवाक्य: Qui transtulit sustinet (लॅटिन)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी हार्टफर्ड
मोठे शहर ब्रिजपोर्ट
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४८वा क्रमांक
 - एकूण १४,३५७ किमी² 
  - रुंदी ११३ किमी 
  - लांबी १७७ किमी 
 - % पाणी १२.६
लोकसंख्या  अमेरिकेत २९वा क्रमांक
 - एकूण ३५,७४,०९७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २७१/किमी² (अमेरिकेत ४वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $६८,५९५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ९ जानेवारी १७८८ (५वा क्रमांक)
संक्षेप   US-CT
संकेतस्थळ www.ct.gov

कनेटिकट(अमेरिकन उच्चार) किंवा कनेटिकट(मराठी उच्चार) (इंग्लिश: Connecticut; En-us-Connecticut.ogg उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेटिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

कनेटिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यू यॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे न्यू यॉर्क शहराचे लॉंग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेटिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यू यॉर्क महानगरामध्ये गणला जातो.

कनेटिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेटिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.

न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.

मोठी शहरे

[संपादन]

इतर शहरे

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: