एअरबस ए३२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरबस ए-३२०
Lufthansa Airbus A320-211 D-AIQT 01.jpg

लुफ्तान्साच्या मालकीचे एअरबस ए३२०-२११ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, जर्मनी, इटली
उत्पादक एअरबस
रचनाकार एअरबस
पहिले उड्डाण २२ फेब्रुवारी १९८७
समावेश १८ एप्रिल १९८८ (एअर फ्रान्स)
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादित संख्या ६,३३१ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)
प्रति एककी किंमत ए३१८: US$71.9 (€53) दशलक्ष[१]
ए३१९: US$85.8 (€64) दशलक्ष[१]
ए३२०: US$93.9 (€70) दशलक्ष [१]
ए३२१: US$110.1 (€82) दशलक्ष[१]
उपप्रकार एअरबस ए३१९

एअरबस ए३२० हा मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी (२,९०० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे.

ए-३२०चे ३२०-१०० आणि ३२०-२०० हे दोन उपप्रकार असून -१०० प्रकारची फक्त २१ विमाने तयार केली गेली. एर इंटर आणि ब्रिटिश कॅलिडोनियन एरवेझला (नंतर ब्रिटिश एरवेझचा भाग) पुरवण्यात आली.

३२०-२००चा इंधनवापर कमी असून पल्ला जास्त आहे. याच्या पंखांवर विंगटिप असतात. याला दोन सी.एफ.एम. ५६-६ किंवा आय.ए.ई व्ही२५०० प्रकारची विमाने लावलेली असतात.

बोईंग ७३७-८०० हे ए-३२०चे थेट स्पर्धक प्रकारचे विमान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ .