जेट विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेट विमाने म्हणजे पंखा (प्रॉपेलर) विरहीत विमाने. ही विमाने जास्त उंचीवर अधिक फलदायी असतात. यातले पहिले जेट विमान कोंडा १९१० (इंग्लिश: Coanda-1910) हे होते. हे एका हेन्री कोंडा नावाच्या रोमेनियन पायलट ने इ.स. १९१० मध्ये चालवले होते. नवीन पिढीची जेट विमाने साधारण पणे ६८० किमी प्रती तास ते ९०० किमी प्रती तास वेगाने उडतात. हा वेग, आवाजचा वेग माख (इंग्लिश: Mach) या पेक्षा ७५% ते ८०% भरतो. वेग आणि विविध प्रकारच्या हवामानात वापराच्या सुलभतेमुळे ही विमाने प्रवासी विमान म्हणून प्रचलित झाली आहेत. ही विमाने मोठे अंतर वेगात कापू शकत असल्याने बहुतेक सर्व आंतरखंडीय प्रवासांसाठी यांचाच वापर केला जातो.

हे सुद्धा पहा[संपादन]