एअरबस ए३१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरबस ए३१९
2010-07-08 A319 BA G-EUOI EDDF 01.jpg

ब्रिटिश एअरवेजच्या मालकीचे एअरबस ए-३१९ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, जर्मनी, इटली
उत्पादक एअरबस
रचनाकार एअरबस
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मूळ प्रकार एअरबस ए३२०

एअरबस ए३१९ हे एअरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एअरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला[१][२][३] ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी झाला आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. एअरबस ए३२०ची तांत्रिक माहिती.[मृत दुवा]
  2. एअरबस ए३२१ची तांत्रिक माहिती.[मृत दुवा]
  3. ३.० ३.१ एअरबस ए३१९ची तांत्रिक माहिती.[मृत दुवा]