इ.स. १९४८
Appearance
(ई,स. १९४८ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ४ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
- जानेवारी ५ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
- जानेवारी ३० - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
- जानेवारी ३० - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
- फेब्रुवारी २- श्रीलंका (तत्कालीन सिलोन) युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- फेब्रुवारी २२ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.
- मार्च ८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.
- मे १ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्वात आले.
- मे १५ - ईजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्रायेलवर हल्ला केला.
- मे १६ - चैम वाइझमान इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- मे ३० - अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.
- जून १ - भारताच्या महाराष्ट्रराज्यात सरकारी महामंडळाद्वारे एसटीबससेवेला प्रारंभ
- जून ७ - चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.
- जून ८ - जॉर्ज ओरवेलची नाइन्टीन एटी फोर(१९८४) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
- जून २६ - सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.
- जुलै २० - सिंगमन ऱ्ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै २६ - हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
- जुलै २६ - आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै ३१ - न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
- ऑगस्ट १५ - दक्षिण कोरियाची निर्मिती.
- सप्टेंबर ९ - उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस
- ऑक्टोबर ५ - अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- जानेवारी ७ - शोभा डे, भारतीय लेखिका
- फेब्रुवारी २४ - जे. जयललिता, भारतातील तमिळनाडूची मुख्यमंत्री.
- मार्च ११ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलँड्सचा गायक व गिटारवादक.
- जून २० - लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट ३ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ७ - ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
- सप्टेंबर १० - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
- सप्टेंबर १२ - मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - रॉबर्ट अँडरसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ३० - महात्मा गांधी.
- जानेवारी ३० - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- मार्च ४ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.