इ.स. १९९१
Appearance
(इ. स. १९९१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९८८ - १९८९ - १९९० - १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी ९ - लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
- जानेवारी १३ - लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस येथील स्वातंत्र्यसैनिकांवर रशियन सैनिकांनी हल्ला केला.
- जानेवारी १७ - आखाती युद्ध - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म पहाटे सुरू. इराकने इस्रायेल वर ८ स्कड क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायेलकडून प्रत्युत्तर नाही.
- जानेवारी १७ - ओलाफ पाचव्याच्या मृत्यूनंतर हॅराल्ड पाचवा नॉर्वेच्या राजेपदी.
- फेब्रुवारी ७ - हैतीत पहिल्यांदा निवडलेल्या अध्यक्षाची सद्दी. ज्यॉॅं-बर्ट्रांड अरिस्टिड राष्ट्राध्यक्षपदी.
- फेब्रुवारी ७ - आय.आर.ए.ने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर (१०, डाउनिंग स्ट्रीट)वर हल्ला केला.
- फेब्रुवारी २३ - पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
- फेब्रुवारी २३ - थायलंडमध्ये लश्करी उठाव.
- फेब्रुवारी २७ - कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
- मार्च २ - पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई.
- मार्च ३ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
- मे ३ - विंडहोकचा जाहीरनामा प्रकाशित.
- मे ५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये दंगा.
- मे १५ - एडिथ क्रेसॉॅं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- मे २१ - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरुम्बुदुर येथे हत्या.
- मे २४ - इस्रायेलने इथियोपियातील ज्यूंना इस्रायलला नेले.
- जून ७ - फिलिपाईन्समधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
- जून १५ - लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षास बहुमत.
- जून २१ - पी.व्ही.नरसिंहराव भारताच्या पंतप्रधानपदी.
- जून २४ - जे.जयललिता पहिल्यांदा तामीळनाडुच्या मुख्यमंत्रीपदी.
- जून २७ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै १० - बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै ११ - नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.
- ऑगस्ट ७ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
- सप्टेंबर ९ - ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- मे २१ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान.
- मे २२ - श्रीपाद अमृत डांगे, भारतीय साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
- ऑगस्ट २० - गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
- सप्टेंबर २२ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
- सप्टेंबर २८ - माइल्स डेव्हिस, अमेरिकन जॅझ संगीतकार.
- ऑक्टोबर ५ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |