पहिले आखाती युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आखाती युद्ध

दिनांक ऑगस्ट २, १९९० - फेब्रुवारी २८, १९९१
स्थान मध्य-पूर्व
परिणती युती राष्ट्रांचा विजय, इराकच्या कुवेतवरील अतिक्रमणाचा शेवट
युद्धमान पक्ष
कुवेत कुवेत

अमेरिका अमेरिका
युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन
कॅनडा कॅनडा
बांगलादेश बांग्लादेश
इजिप्त इजिप्त
फ्रान्स फ्रान्स
सीरिया सिरिया
मोरोक्को मोरोक्को
ओमान ओमान
पाकिस्तान पाकिस्तान
इटली इटली
कतार कतार
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
सौदी अरेबिया सौदी अरेबिया
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड न्यू झीलंड

इराक इराक
सेनापती
जनरल कॉलिन पॉवेल


पहिले आखाती युद्ध (अन्य नावे: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म ; अरबी: حرب الخليج الثانية ; इंग्रजी: Gulf War, गल्फ वॉर ;) हे इराणच्या आखातामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, व तिच्या ३४ मित्र राष्ट्रांची आघाडी विरुद्ध इराक यांच्यात घडलेले युद्ध होते. २ ऑगस्ट, इ.स. १९९० रोजी आरंभलेले हे युद्ध २८ फेब्रुवारी, इ.स. १९९१ रोजी संपले.

२ ऑगस्ट, इ.स. १९९० रोजी इराकी सैन्याने कुवेतावर आक्रमण केले. इराकी आक्रमणाविरुद्ध आंतराष्ट्रीय समुदायाने तीव्र निषेध नोंदवला. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी प्रत्युत्तरादाखल इराकावर आर्थिक निर्बंध लादले. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी सौदी अरेबियात अमेरिकी फौजा उतरवून मित्र राष्ट्रांनाही फौजा धाडण्याचे आवाहन केले. अनेक मित्र राष्ट्रांच्या आघाडी सैन्यात अमेरिका, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डमइजिप्त यांच्या सैन्यदलांचा प्रमुख सहभाग होता.

कुवेतात घुसलेल्या इराकी सैनिकांना पिटाळून लावायला १७ जानेवारी, इ.स. १९९१पासून हवाई बॉंबहल्ले चालू झाले व त्यापाठोपाठ २३ फेब्रुवारीपासून जमिनीवरून हल्ले आरंभण्यात आले. या युद्धात आघाडी सैन्याने निर्णायक विजय मिळवत कुवेतातून इराकी सैन्यास पिटाळून तर लावलेच, शिवाय इराकी सीमेतही मुसंडी मारली.

पहिल्या आखाती युद्धातील व्यूहरचना - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]