इंदापूर तालुका
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
इंदापूर तालुका | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील इंदापूर तालुका दर्शविणारे स्थान | |
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | बारामती |
मुख्यालय | इंदापूर |
इंदापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे नाव अनेक ठिकाणी इंद्रापूर असे वाचण्यात येते.
माहिती[संपादन]
इंदापूर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून पुणे जिह्याच्या पूर्वेस शेवटचा तालुका आहे. इंदापूर तालुका भीमा व नीरा नदीच्या परिसरात आहे. पौराणिक काळात इंदापूरचे नांव इंद्रपुरी असे होते. तालुक्याचा भाग पूर्वी मालोजीराजे भोसले यांचे जहागिरीमध्ये समाविष्ट होता. इंदापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्यामधून पुणे-हैद्राबाद हा [[राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जात असून इंदापूर-पुणे हे अंतर १३५ कि. मी. आहे.
तालुक्याचे उत्तर सीमेवर भीमा नदी वाहत असून दक्षिणेस नीरा नदी आहे. भीमा नदीवर सुप्रसिद्ध उजनी धरण असून जलाशयात २२ गावे बुडाली आहेत.. धरणाच्या पाण्याचा फुगवटा सुमारे ५० कि. मी. असून त्या पाण्याचा उपयोग कृषिविकास व मत्स्यपालनासाठी होत आहे. तालुक्यातील भीमा व नीरा दोन नद्या, धरणाच्या पाण्याचा फुगवटा व नीरा कालवा यामुळे बहुतांशी भाग बागायती असून तालुक्याचा मध्यभागच्या पठारावरील भाग हा जिरायती आहे. प्रमुख व्यवसाय शेती असून ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इंदापूर तालुक्यात सहकारी तत्त्वावर तीन साखर कारखाने आहेत. सर्वात जुना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर असून त्यानंतर इंदापूर सहकारी आत्ताचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले नगर बिजवडी व त्यानंतर नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर हा आहे. तसेच एक खाजगी साखर कारखाना एक व खाजगी गुळाचा कारखाना आहे.
इंदापूर तालुक्यात शेतीसाठी प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या एकूण 305 सोसायट्या कार्यरत आहेत.
इंदापूर तालुक्यात एकूण 115 ग्रामपंचायती आहेत.
इंदापूर तालुक्यात शेतकर्यांचे सेवेत अग्रक्रमी काम करणारी कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर यांचे संयुक्त विद्यामाने शेतमाल निर्यात सुवीधा केंद्र कार्यरत आहे. या सुवीधा केंद्रामधून केळी, डाळींब द्राक्षे निर्यात केली जातात.या तालुक्यात डाळिंब,द्राक्षे,ढोबळी मिरची,टोमॅटो,व इतर सर्व पिके घेतली जातात
संदर्भ[संपादन]