दौंड तालुका
दौंड तालुका | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील दौंड तालुका दर्शविणारे स्थान | |
राज्य |
महाराष्ट्र, ![]() |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | बारामती |
मुख्यालय | दौंड |
क्षेत्रफळ | १२९० कि.मी.² |
लोकसंख्या | ३,८२,५३५ (२०११) |
लोकसंख्या घनता | ३००/किमी² |
शहरी लोकसंख्या | ५६,४३६ |
लोकसभा मतदारसंघ | बारामती |
विधानसभा मतदारसंघ | दौंड |
दौंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. दौंड हे येथील एकमेव शहर आहे.
क्षेत्रफळ/भौगोलिक रचना[संपादन]
दौंड तालुका पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याचे क्षेत्रफळ १,२९० चौरस किमी इतके तर लोकसंख्या ३.८२ लाख इतकी आहे.दौंड येथे रेल्वे जंक्शन आहे येथे स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय दौंड आहे .येथे एस आर पी ट्रेनिंग सेंटर आहे .बस स्थानक आहे
शेती[संपादन]
लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून गहू, ज्वारी आणि ऊस ही इथली महत्त्वाची पिके आहेत. साखरेची येथून निर्यात होते.
झाडोरा[संपादन]
ह्या तालुक्यातील महत्त्वपूर्ण झाडोरा हा काटेरी झुडुपी जंगल या प्रकारांतर्गत मोडते. महत्त्वाच्या वनस्पतीत बोर, बाभूळ, हिवर इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो.
दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार[संपादन]
- मा.आमदार राहुल(दादा) सुभाष कुल.
भाजप
संदर्भ[संपादन]
दुष्काळाबाबत काही हितगूज[संपादन]
हरीष खोमणे, रा.दौंड (अध्यक्ष, पुणे जिल्हा रासप)[संपादन]
• कायमस्वरुपी दुष्काळावर मात करणेसाठी व सध्या महाराष्ट्रभर शिरपूर पॅटर्न राबवीला जातोय, त्या शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांचे नुकतेच दौंड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी वर्गाला खूप मोलाचे मार्गदर्शन झाले, त्याचे नियोजन दौंड तालुक्याचे रासपचे धडाडीचे युवा आमदार मा. ॲड. राहुलदादा कुल यांनी दि.15/09/2015 रोजी चौफुला ता.दौंड येथे केले होते, त्यामुळे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल व सुरेश खानापूरकर सर यांचे दौंड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गाचे वतीने जाहिर आभार. या कार्यक्रमास मी स्वतः उपस्थीत होतो, खानापूरकर सरांनी पुढील प्रमाणे महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि माझ्या सारख्याला ते अतीशय महत्त्वाचे वाटतात. • कुठलाही प्रयोग करा पण पाणी हे जमीनीत मुरलेच पाहिजे. • या पावसाच्या पाण्याची भेट ही पुढच्या पावसाच्या पाण्याशी होणे म्हणजेच शिरपूर पॅटर्न • उगमापासून ते संगमापर्यंत बंधारे बांधले पाहिजेत • जागेनुसार लहान लहान बंधारे बांधले तरी चालतील • नाल्यांची ऍन्जीओेप्लास्टी करुन (खडक ब्लास्टिंग करुन) नाले रुंद करुन पाणी जमीनीत मुरवले पाहिजे • पानलोट क्षेत्राच्या वरील भागात समतोल चर खोदणे आवश्यक आहे • 50 ते 100 फुट रुंद व 25 ते 60 फुट खोल याप्रमाणे बंधारे बांधावेत • विहिर पुर्नभरण हा उत्तम पर्याय • 300 ते 400 मीटर अंतरावर बंधारे बांधले पाहिजेत हे सर्व प्रकारचे काम शिरपूर जि.धुळे येथे केल्याने तेथे दुष्काळ जाणवत नाही आणि पूरही येत नाही, 300 फुटापर्यंत बोअर घेऊन सुद्धा पाणी लागत नव्हते, अशा ठिकाणी आज बोअर ऊफाळून वाहतात, ही आजची परिस्थीती आहे. त्यामुळे शिरपूर पॅटर्न राबवायचा असेल तर जनतेचा सहभाग आणि शासकीय अधीकारी वर्गाची मानसिकता देखील तितकीच महत्त्वाची आहे, आपल्या राज्यात गेल्या 15 वर्षात जवळपास 3 लाख कोटी रुपयांची सिंचनावर कामे केली परंतू फक्त 14 टक्के क्षेत्र ओेलीताखाली आणले ही लाजीरवाणी गोष्ट आहे, ज्या भागात पूर येऊन गेला त्याच भागात दुष्काळ जाहिर केला, याला काय म्हणावं. त्यामुळे जागरुक शेतकरी व नागरीकांना विनंती की, पुढील पिढया सुखात जगाव्याशा वाटत असतील आजच नियोजन करा आणि देशसेवेचं एक प्रमाणीक काम हातात घ्या. मी तर म्हणतो की, घराची, फलॅटची नोंद करताना पावसाचे पाणी शोष खडयात सोडणेची व्यवस्था केलेली असेल तरच नोंद घ्यावी अन्यथा नोंद घेऊ नये आणि कुठलीही शासकिय योजना त्या घरमालकास लागू करु नये. त्याची अंमलबजावणी ही सक्तीची करणेकरीता मी तसा पाठपुरावा मा.महादेवजी जानकर साहेब, नामदार पंकजाताई मुंडे, आमदार राहुलदादा कुल यांचे मार्फत संबंधीतांकडे शासनस्तरावर करण्याचा प्रयत्न करत असतो, आपण या विषयावर प्रतिक्रिया देणार असाल तर भ्रमणध्वनी – 8275467571.