आंबेगाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंबेगाव तालुका
Ambegaon tehsil in Pune district.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील आंबेगाव तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग खेड
मुख्यालय घोडेगाव


प्रमुख शहरे/खेडी मंचर, घोडेगाव
लोकसभा मतदारसंघ शिरूर
विधानसभा मतदारसंघ आंबेगाव
आमदार दिलीप वळसे


आंबेगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

गोहे बुद्रुख[संपादन]

मंचरकडून भिमाशंकरकडे जाताना डिंभे गाव लागते. तेथून डाव्‍या बाजूला साधारपणे अर्धा-पाउन किलोमिटरवर गोहे गाव लागते. शांत नयनरम्‍य परिसर. चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले. जणू कोकणातील एखाद्या गावात आल्‍यासारखे वाटते. खाचरांची शेत जमिन. पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती. येथील सालसिध्‍देश्‍वर हे देवस्‍थान जागृत देवस्‍थान म्‍हणून प्रसिध्‍द आहे.