सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन (डीडी नॅशनल), स्टार नेटवर्क, स्टार प्रवाह
भाषा हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगु, तमिळ
देश भारत
निर्माता आमीर खान, किरण राव
दिग्दर्शक सत्यजित भटकळ
निर्मिती संस्था आमीर खान प्रॉडक्शन
सूत्रधार आमीर खान
कलाकार आमीर खान
प्रसारण माहिती
पहिला भाग ६ मे २०१२
एकूण भाग १३
निर्मिती माहिती
कॅमेरा शांती भूषण रॉय
कालावधी ६० ते ६५ मिनीटे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

’सत्यमेव जयते’ हा आमीर खान यांचा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम दूरदर्शन (डीडी नॅशनल) तसेच स्टार नेटवर्क वर ६ मे २०१२ पासून प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे.


संकल्पना[संपादन]

कार्यक्रमाची संकल्पना गोपनीय ठेवण्यात आली होती. मालिकेतील ६ मे रोजी प्रक्षेपित झालेले पहिले पुष्प ’स्त्रीभ्रूण-हत्या’ या विषयावर होते. ह्या कार्यक्रमाची निर्मिती सर्वसाधारण भारतीय नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाची केली गेली आहे.

उदय प्रकाश, स्टार इंडिया चे संचालक, यांनी आमीर खान यांना टेलिव्हिजनच्या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. खान आधी तयार नव्हते, पण नंतर फक्त दोन वर्षे या विषयावर कार्यक्रम करण्यास ते तयार झाले. झी न्यूजच्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, "आधी मी हा कार्यक्रम करण्यास तयार नव्हतो, कारण याचा मार्ग सोपा नाही. आम्ही काहीतरी वेगळे करत आहोत हे आम्हाला माहीत होते. ती थेट आमच्या हृदयातून निघालेली गोष्ट होती."[१] त्याने हेही सांगितले, "मी अजून दूरचित्रवाणीला जाणून घेतलेले नाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, मी हा कार्यक्रम पूर्ण प्रामाणिकपणे केला आहे, आणि तोही कसलीही तडजोड न करता! "

या कार्यक्रमाचे चित्रीकरण भारतातल्या विविध राज्यांमध्ये झाले आणि खान यांनी कित्येक आठवडे त्यासाठी राजस्थान, काश्मीर, केरळ, दिल्ली, पंजाब, आणि ईशान्य भारत या भागांत प्रवास केला.[१] कार्यक्रमाचा स्टुडिओतील भाग वृंदावन स्टुडिओमध्ये चित्रित केला गेला. [२] आणि यशराज स्टुडिओ मुंबईमध्ये .[३] खान या कार्यक्रमाला 'सत्यमेव जयते' हे नाव ठेवताना ते जरा विचलित झाले होते. हे नाव भारतीय जनतेच्या मालकीचे आहे. 'ते' देशाशी निगडित आहे आणि म्हणून कोणाच्याही नावावर नोंदलेले असू शकत नाही, आणि त्यामुळे कॉपीराईटचा प्रश्नच येत नाही, अशी खान यांना जाणीव झाली. या नावाचा कुठल्याही प्रकारे अन्य प्रदर्शनासाठी वापर होता कामा नये, म्हणून या शोचे सहकारी हेच नाव शीर्षक म्हणून ठेवण्यास तयार झाले.[४]

पहिला भाग[संपादन]

६ मेच्या पहिल्या भागात "स्त्री-भ्रूणहत्या" या विषयावरील चर्चा हाताळण्यात आली. दर हजारी पुरुषांमागे घटत्या स्त्री संख्येवर प्रकाश टाकण्यात आला, व अशी घटत्या संख्येला आळा घालण्यासंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्‍न केला गेला. कार्यक्रमात अनुभवी वैद्य (डॉक्टर) तसेच भ्रूण हत्येमधून गेलेल्या महिलांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या.

दुसरा भाग[संपादन]

१३ मे इ.स. २०१२ च्या दुसऱ्या भागात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती देण्यात आली, व ते रोखण्यासाठी कार्यक्रमाशेवटी मुलांची कार्यशाळा घेण्यात आली.

तिसरा भाग[संपादन]

२० मे २०१२. यामध्ये हुंडा पद्धतीबद्दल चर्चा करण्यात आली. हुंडा द्यायला नकार देणाऱ्या एका मुलीची मुलाखत यात दाखवण्यात आली."मुझे क्या बेचेगा ....रुपैय्या" हे गाणे यात सादर झाले

चौथा भाग[संपादन]

२७ में २०१२ ला चौथा भाग झाला. या भागामध्ये डॉक्टरांवर वक्तव्य करण्यात आले. फक्त पैसे उकलण्यासाठी काम करत असलेल्या काही डॉक्टरांच्या कामाचे नमुने यात दाखवण्यात आले. तसेच औषधांच्या वाढत्या किमतीवर यात भाष्य करण्यात आले. तसेच त्यासाठी काही उपायही सुचवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ "असे म्हणतात की TV साठी तयार होताना आमीर खान घाबरले होते.", झी बातम्या, एप्रिल. 
  2. "Fire on Aamir Khan's upcoming TV show set", एनडीटीव्ही. (इंग्लिश मजकूर) 
  3. "Aamir Khan moves TV show to YRF", भाषा=इंग्लिश. 
  4. Template error: argument शीर्षक is required.