नांदगाव (जव्हार)
?नांदगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .९१३२४ चौ. किमी |
जवळचे शहर | जव्हार |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
१,६१४ (२०११) • १,७६७/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | आदिवासी कातकरी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०३ • +०२५२० • एमएच४८ |
नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]जव्हार शहरापासून हे २५ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०७ कुटुंबे राहतात. एकूण १६१४ लोकसंख्येपैकी ८०७ पुरुष तर ८०७ महिला आहेत. गावाची साक्षरता ६८.७९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.०३ आहे तर स्त्री साक्षरता ५९.४८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.४४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारपासून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]साकुर, आखर, कौलाळे, शिरसगाव, श्रीरामपूर, राजेवाडी, झाप, शिवाजीनगर, डोंगरवाडी, पाथर्डी, चौक ही जवळपासची गावे आहेत.नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये नांदगाव आणि राजेवाडी ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036