राजेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?RAJEWADI

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर आटपाडी
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच प्रशांत शहाजी शिरकांडे
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
संकेतस्थळ: 10 mh 10

राजेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

राजेवाडी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वसलेले गाव आहे. येथील लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. या गावाचे तळे तीन जिल्ह्यांना जोडले गेले आहे. तलावाचा एक काठ सातारा जिल्ह्याला जोडलेला आहे, दुसरा काठ सांगली जिल्ह्याला जोडलेला आहे तर तिसरा भाग सोलापूर जिल्ह्याला जोडलेला आहे. सातारा जिल्हा तलाव मध्ये पाणी साठवतो, सांगली जिल्हा तलावाचे दरवाजे उघडतो, तर सोलापूर जिल्हा ते सोडलेले पाणी वापरतो. ह्या गावातील कॅनॉल सिस्टीम अतिशय जुनी असून याचा आदर्श घेऊन अनेक मोठे सिंचन प्रकल्प उभे राहिले आहेत. राणीचा महाल आणि पाचीदारे,20 नाला येथे इंग्रज कालीन वास्तू कलेचा उत्तम नमुना पाहायला भेटतो. कानिफनाथ मंदिरात दरवर्षी यात्रा उस्तव भरतो. हे गाव सातारा सांगली आणि सोलापूर यांच्या सीमेवर आहे. गावात आयाताकृती वस्ती असून अनेक प्रमुख चौक पाहायला भेटतात.गाव नकाशा आखून बसवलेलं आहे. भैरवनाथ मंदिर परिसरात हवामान केंद्र आणि धर्मशाला आहे. गावात प्रमुख पीक ऊस असून इतर आंतरपिके घेतली जातात. उद्योग व्यवसायात गाव आत्मनिर्भर असून वीट उद्योगात महाराष्ट्रातील अव्वल भागांपैकी एक आहे. साखर उद्योग सुद्धा भरभराटीला आला आहे. गावात साक्षरता प्रमाण चांगले असून शैक्षणिक सुविधांचा मात्र वणवा आहे.7 वी पर्यंत शिक्षणाची सोय zp school मध्ये आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन[संपादन]

==प्रेक्षणीय स्थळे== 150 वर्ष जुना इंग्रजकालीन तलाव. कानिफनाथ मंदिर,मयुरेश्वर मंदिर आहे. हनुमान मंदिर येथे पहाटे काकड आरती होते. सदगुरू साखर कारखाना येथे आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. कानिफनाथ यात्रा चैत्र महिन्यात भरते व यावेळी धनगर बांधव त्यांचे पारंपरिक गजी नृत्य सादर करतात.भवानीनगर येथील भवानी देवीचे मंदिराराला नवरात्रीत लोक दर्शनाला येतात. वार्षिक 10 जानेवारीला भरणारा अखंड हरिनाम सप्ताह हे विशेष आकर्षण आहे.तसेच गावात प्रमुख कावडीही आहेत. कर्मकांड, जादूटोणा ,अंगात येणे हे प्रकार सुध्धा पाहायला मिळतात. तसेच विविध जयंत्या साजऱ्या केल्या जातात.

नागरी सुविधा[संपादन]

लिंगीवरे, हिंगणी, इटकी ही छोटी गावे शेजारी असून. म्हसवड, दिघंची,तसेच आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असणारी शहरे जवळ आहेत.गाव तीन जिल्ह्याच्या सीमेवर असून सातारा,सांगली, सोलापूर थेट संपर्क आहे. गावात जलसिंचनाच्या उत्तम सुविधा असून ग्रामपंचायत कार्यालय येथे माफक दरात पिण्याचे पाणी भेटते. गावात सहकारी सोसायट्यांचे जाळे असून जिल्ह्यातील प्रसिद्ध सोसायट्या येथे पाहायला भेटतात. रस्ते उत्तम तसेच अंतर्गत रस्ते सिमेंट पासून बनलेले आहेत.अंतर शेत रस्त्यांची वणवा असून गावात वाटा अडवणे ही मोठी समस्या आहे.नाले आणि पाझर तलावही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.शैक्षणिक सुविधा फक्त 7 वी पर्यंत आहे. वैदकिय सुविधा कमी असून सरकारी दवाखाना नाही.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate