असिरिया (रोमन प्रांत)
Appearance
असिरिया (लॅटिन: Assyria) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. तो केवळ इ.स. ११६ ते ११८ एवढाच काळ टिकला. पार्थिया या इराणी साम्राज्याचा पराभव करून सम्राट ट्राजानने तो आपल्या साम्राज्यास जोडला. परंतु तेथील जनतेच्या उठावामुळे या प्रांतावर रोमन वर्चस्व प्रस्थापित होऊ शकले नाही. ट्राजानचा उत्तराधिकारी हेड्रियान याने या प्रांतातून माघार घेतली.