चर्चा:पंढरपूर
समसमीक्षण
[संपादन]पंढरपूर सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.
पंढरपूरमध्ये नदीच्या काठाववर प्रसिद्ध विठोबा मंदिर आहे. विठोबा हा कृष्णाचा अवतार समजला जातो. विठ्ठल हे नाव कानडीतील विष्णूच्या नावावरून आले आहे. विठोबाची पत्नी रखुमाई होय.पुराणांपासून विठोबाची भक्ती केली जाते. संत नामदेव,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. साचा:हि माहिती विठोबा लेखात हवी, पंढरपुर लेखात प्रदिर्घ पुर्नावृत्तीचे कारण नाही मोठ्या क्षेत्रावर बांधलेल्या या मंदिराला सहा प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.पंढरपुरला दक्षिण काशी व तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. [ संदर्भ हवा ] साचा:अमराठी अमहाराष्ट्रीय संदर्भ असेल तर अधीक बरे
पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. चैत्री,आषाढ शुद्ध एकादशी,माघी,कार्तिकी.त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात.
अंनत तीर्थाचे माहेर अंनत रुपांचे सार साचा:अविशवकोशिय - विकिक्वोट प्रकल्पात संदर्भासहित देता येईल
अनंता विठ्ठलाची पंढरी म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी आहे.साचा:या वाक्याची विश्वकोशिय उल्लेकनीयतेवर अधीक चर्चा व्हावयास हवी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पालख्या, वारकरी व दिंड्या आषाढी व कार्तिकी एकादशीला नित्यनियामाने पंढरपूर व सोलापूर तालुक्यातील चंद्रभागेच्या काठच्या गावी येतात. विठ्ठलाचे पादस्पर्शदर्शन केल्याशिवाय या वारकऱ्यांना चैन पडत नाही. साचा:हे वाक्य विठोबा लेखात हवे
देऊळवाडा
[संपादन]पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे. शालिवाहन प्रतिष्ठान राजाने पंढरपुराचे इ. स. ८३ मध्ये संवर्धन केले. ताम्रपत्रावरून इ. स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ. स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेटा दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ. स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून पंढरीच्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेइश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.
चंद्रभागेच्या वाळवंटापलिकडून नदीच्या पात्रातून उंच शिखरे, सपाटा कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश दिसतात हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रूंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरूंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांना `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर चुनेगच्ची सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे नक्षीकाम आहे.
मंडप १८ मीटर रूंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येत. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोले आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रूक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाच परमभक्त पुंडलिक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.
वारकऱ्यांच्या दिंड्या
[संपादन]वारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात., विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीच्या वाटेवर चाललेली दिंडी हे अखिल महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यावेळी या भजनात, नामघोषात वरकरणी निमग्न दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या चित्ताची खरी एकतानता विठ्ठलापाशीच असते. वारीचा देखावा अवर्णनीय असतो. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांची गर्दी पंढरपूरच्या वाटेवरील निरनिराळ्या गावात ज्यावेळी पोहोचते त्यावेळी गावकरी वारकऱ्याचे अनेक प्रकारे स्वागत करण्यास सिद्ध असतात.[ संदर्भ हवा ]
चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतोसाचा:होत असल्यास नेमका किती संदर्भासहित हवे.
इ. स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
पंढरपूर गावाचे मूळचे मराठमोळे वास्तूशिल्प तेथील अनेक देऊळे, मठ, फड व घरे यांतून दृग्गोचर होत होते.
पंढरपूर प्रसिद्ध व्यक्ती बद्दल वेगळा विभाग हवा
- प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.
- प्रसिद्ध लेखक व कवि द. मा. मिरासदार यांचे जन्मस्थळ आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "सोलापुर ज़िल्ह्याच्या संकेतस्थाळावरील पंढरपुर वरील पान". एन. आई. सी. २००७-०९-३० रोजी पाहिले.
प्रस्तावित मजकुर स्थानांतरण
[संपादन]या लेखातील विठ्ठल, वारी/वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागा नदी संबंधीत मजकुर संक्षीप्त करून आवश्यकतेपेक्षा अधिकचा मजकुर विठ्ठल, वारी आणि चंद्रभागा नदी संबधीत मजकुर त्या त्या लेखात नेणे प्रस्तावोत आहे.