रंग दे बसंती
Appearance
रंग दे बसंती | |
---|---|
दिग्दर्शन | राकेश ओमप्रकाश मेहरा |
निर्मिती | युटीव्ही मोशन पिक्चर्स |
कथा | कमलेश पांडे |
पटकथा | राकेश मेहरा, रेंजील डिसुझा |
प्रमुख कलाकार |
आमिर खान सिद्धार्थ नारायण शर्मन जोशी आर. माधवन सोहा अली खान कुणाल कपूर ॲलिस पॅटन अतुल कुलकर्णी वहिदा रेहमान अनुपम खेर |
कला | समीर चंदा, चेतन पाठक |
गीते | प्रसुन जोशी |
संगीत | ए.आर.रहमान |
पार्श्वगायन | चित्रा, मोहम्मद अस्लम, लता मंगेशकर |
वेशभूषा | लवलीन भैंस |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २६ जानेवारी २००६ |
अवधी | १५७ मिनीटे |
रंग दे बसंती हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कथानक
[संपादन]खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खान व राम प्रसाद बिस्मिल ह्या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर एक चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते. तेथे तिची गाठ कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या व वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या काही तरुणांशी पडते.
पुरस्कार
[संपादन]- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा
- सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) - आमिर खान
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - ए.आर. रहमान
बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रंग दे बसंती चे पान (इंग्लिश मजकूर)