Jump to content

चित्रा (नक्षत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

चित्रा (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

भारतीय नक्षत्रांपैकी चौदावे नक्षत्र . ते अयनवृत्ताच्या (सूर्याच्या भासमान वार्षिक गतिमार्गाच्या) दक्षिणेस हस्ताजवळ [ भोग १८०°; शर -२° २′·७; विषुवांश १३ तास, २२ मिनिटे; क्रांती -१०·९, ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] दिसते. यात कन्येतील आल्फा (स्पायका) तारा येतो. तो निळसर, पिधानकारी (ज्यांचे कक्षीय प्रतल जवळजवळ दृष्टिपथरेषेत आहे असे समाईक केंद्राभोवती फिरणारे घटक तारे असलेला) युग्मतारा असून त्याची भासमान प्रत १·०० [ निरपेक्ष प्रत-३, ⟶ प्रत ] आहे. त्याचा वर्णपट प्रकार बी १, अंतर सु. २४५ प्रकाशवर्षे, तापमान २०,०००° के., गती सेकंदास १३० किमी. पेक्षा जास्त, तेजस्वीपणा सूर्यापेक्षा १,५०० पट व व्यास सूर्याच्या अनेकपट आहे. युग्मताऱ्यातील अंधुक तारा हा तेजस्वी तारा व पृथ्वी यांच्यामधून दर चार दिवसांनी एकदा जातो तेव्हा ग्रहणाप्रमाणे त्याचा तेजस्वीपणा तात्पुरता घटतो. त्याच्या वर्णपटात हीलियमाच्या रेषा दिसतात. हिपार्कस यांनी ⇨संपातचलनाचा शोध या ताऱ्याच्या माहितीवरून लावला. वराहमिहिरांनी पंचसिद्धांतिकेत याचे स्थान दर्शविले आहे. तैत्तिरीय व शतपथ ब्राह्मण; ऋक् संहिता आणि तैत्तिरीय श्रुती यांच्यात याचा उल्लेख असून अथर्ववेदात चित्रा ही देवता आहे.या नक्षत्राची देवता त्वष्टा, आकृती मोती आणि रूपसंज्ञा मृदू व मत्र आहे. ते तिर्थङमुख व यज्ञसाधक मानतात. पूर्वी अश्वमेघ यज्ञाचा संकल्प चित्रेत सोडीत. या नक्षत्री जन्म चांगला समजतात. चित्रेसंबंधी पुढील कथा आहे. स्वर्गप्राप्तीसाठी असुरांनी यज्ञ करताना ब्राह्मणरूपी इंद्राने दिलेली सोन्याची वीट चयनासाठी वापरली. ती इंद्राने परत मागितली तेव्हा असुरांनी ती काढून आकाशात भिरकाविली, तीच चित्रा होय.

                  ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)